एक्स्प्लोर

'आपलं गिरगाव' कॅलेंडर साकारताना...

एबीपी माझाचे अँकर अश्विन बापट यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह 'आपलं गिरगाव' हे कॅलेंडर साकरलं आहे. हे कॅलेंडर साकारताना त्यांना आलेले अनुभव, केलेल्या भेटीगाठी याबाबत केलेलं सविस्तर लिखाण

आपण ज्या परिसरात राहातो, वाढतो, त्याच्याशी आपलं एक घट्ट नातं निर्माण होतं. आपल्या आईवडिलांप्रमाणे तुम्हाला तुमची राहाती जागा, तो परिसर बरंच काही देऊन जात असतो. संस्काराचं आदान प्रदान करत असते. माझ्या बाबतीत गिरगावशी माझं असलेलं नातं अगदी असंच आहे. माझा जन्म वरळीतला. आजीकडे सुरुवातीची दोन-तीन वर्षे वाढलो. त्यामुळे जांबोरी मैदान-वरळी परिसराशी खास जिव्हाळा आहेच. म्हणजे नवरात्रोत्सवात एक दिवस तरी तिकडे जत्रेला आणि दर्शनाला आवर्जून जाण्याचा माझा प्रयत्न असतो, पण त्यानंतरच्या काळात सीनियर केजीपासूनचं माझं सगळं शिक्षण आणि आतापर्यंतची वाटचाल गिरगावातली. त्यामुळे गिरगावशी असलेलं नातं शब्दापलिकडचं आहे. शाळा, कॉलेज, पहिल्यांदा दै. नवशक्ति आणि आता एबीपी माझा या प्रवासात गिरगावने मला खूप साथ दिली आहे. त्याच गिरगावसाठी आपण काहीतरी करावं, असं गेल्या काही वर्षांपासून मनात होतं. त्याला अखेर यावर्षी मूर्त रुप आलं आणि 'आपलं गिरगाव दिनदर्शिका 2020' चा जन्म झाला.

काळानुरुप बदलत जाणारं गिरगाव हे वास्तव असलं तरी या गिरगावच्या सांस्कृतिक, वैचारिक श्रीमंतीची जपणूक करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे कॅलेंडर. या कॅलेंडरच्या निर्मितीसाठी खरं तर अनेक मंडळींचं छोटंमोठं योगदान आहे. तरीही चार जणांची नावं इथे घ्यायलाच हवीत. अरुण पुराणिक, दिलीप ठाकूर या दोन ज्येष्ठ पत्रकार, लेखकांसोबतच शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ आणि बाळा अहिरेकर. पुराणिक आणि दिलीप ठाकूर हे माजी गिरगावकर. म्हणजे फक्त शरीराने. मनाने इथेच असतात. याच धाग्याने आम्ही एकत्र आलो. दिलीप ठाकूर हे नवशक्तिमधले माझे ज्येष्ठ सहकारी. पण, पुराणिक सरांशी ओळख झाली ती एबीपी माझामुळे. माझाच्या 'फ्लॅशबॅक' या कार्यक्रमाने आम्हाला एकत्र आणलं, त्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांना खास धन्यवाद. त्यांच्यामुळे तीन गिरगावकर एकत्र आले आणि कॅलेंडरचा जन्म झाला असंच मी म्हणेन. पुराणिक सर मुंबईचे ज्येष्ठ अभ्यासक, पॅशनेट गिरगावकर. तर दिलीप ठाकूर म्हणजे सिने क्षेत्राचं गुगलच जणू. तेही कट्टर गिरगावकर.

एकदा असेच तिघेजण गप्पा करत होतो, तेव्हा गिरगावचा विषय निघाला. ही दोन्ही मंडळी म्हणजे अनुभवाची खाण असल्याने निरनिराळ्या विषयांचे संदर्भ चुटकीसरशी सांगत होते दोघेही. तेव्हाच मनात आलं, गिरगाव या संकल्पनेभोवती हे विषय गुंफण्याचा प्रयत्न करु. चाळ हा विषय साहजिकच ओघाने आला. चाळीत घराच्या दरवाजांसोबत मनाचे दरवाजेही सदैव उघडे असतात. याचा प्रत्यय आम्हा तिघांनाही वेळोवेळी आलाय. टॉवरच्या जमान्यातही चाळ संस्कृतीची मूळं किती घट्ट रुजलीत, हे दाखवणं गरजेचंच. त्याचसोबत मग कला, साहित्य, राजकीय, खाद्यसंस्कृती असे विविध 12 विषय निवडले. प्रत्येक विषयातली गिरगावची श्रीमंती, सुदृढता त्याबद्दलची माहिती गोळा करताना कळल्याने छाती अभिमानाने फुलून आली. त्याचसोबत सांस्कृतिकदृष्ट्या इतक्या समृद्ध भागात आपण राहतोय, हे आपलं भाग्यच असंही मनात आलं. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील गिरगावपासून ते मेट्रोच्या वेगाने धावू पाहणाऱ्या गिरगावचा प्रवास या 12 विषयांच्या माध्यमातून लेखांमध्ये आणण्याचा प्रयत्न या कॅलेंडरमध्ये केला.

त्यासोबत विविध क्षेत्रातील 14 नामवंत व्यक्तींशी संवाद साधला ज्या गिरगावच्या आजी-माजी रहिवासी होत्या, आहेत किंवा ज्यांच्या करिअरमध्ये गिरगावचा मोलाचा वाटा आहे. त्यांना एकच प्रश्न विचारला, गिरगावने तुम्हाला काय दिलं?

ज्येष्ठ नाट्य कलावंत जयंत सावरकर यांना मी जेव्हा या प्रतिक्रियेसाठी फोन केला, तेव्हा शब्दागणिक त्यांचा स्वर अश्रूंमध्ये भिजून गेला, गिरगावबद्दल बोलताना ते खूप भावूक झाले होते. अश्रूंमधून जणू आठवणीच वाहत होत्या झऱ्यासारख्या.

रमेश देव, सीमाताई, अशोक सराफ, निवेदिता सराफ, मिस्टर 'व्हाईट अँड व्हाईट' अर्थात आमचे गिरगावकर मुळ्येकाका सगळेच जण गिरगावबद्दल बोलताना त्यांच्या प्रवासात डोकावत होते, इमोशनल होत होते. भरभरुन बोलत होते, गिरगावबद्दल बोलताना जणू अंतरंगात पाहून ते गतकाळातील क्षण पुन्हा पुन्हा जगत होते. हे कॅलेंडर साकारणं, माझ्यासाठी खूप काही देऊन जाणारी प्रोसेस होती. अनेकांचं मोठेपण नव्याने कळलं, अनेकांचं पहिल्यांदाच.

आमची टीमही छान जमली कॅलेंडरसाठी. ठाकूर आणि पुराणिक हे वय, अनुभवासह या क्षेत्रातील योगदान, अशा सर्वच बाबतीत कैक पटीने ज्येष्ठ. मात्र दोघांचं मोठेपण हे की, त्यांच्या वयाची, ज्येष्ठत्वाची भिंत त्यांनी पाडून टाकली. मी या कॅलेंडरच्या निर्मितीच्या वेळी जे काही स्पष्ट विचार मांडले, सूचना केल्या. त्या त्यांनी ऐकून घेतल्या, स्वीकारल्याही. (गिरगावकर असल्याने अॅडजस्ट होणं, गोष्टी स्वीकारणं आमच्या रक्तात आहे. हे तिघेही जाणून आहोत)

अशी एनर्जेटिक आणि दुसऱ्याच्या मताचं मूल्य जपणारी मंडळी तुम्हाला मार्गदर्शन करायला, तुमच्यासोबत काम करायला असतील तर हुरुप मिळतो, कितीही काम केलं तरी थकवा जाणवत नाही. साधारण दीड-दोन महिन्यात या कॅलेंडरसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. त्याच वेळी न्यूजचॅनलमध्ये काम करत असल्याने, त्यात सतत घडामोडी घडत असल्याने ऑफिसमधील कामाचीही गडबड होतीच. ते सांभाळून या कॅलेंडरच्या कामाकरता कोणतीही रजा न घेता हे कॅलेंडर पूर्ण केलं, याचं खास समाधान आहे. प्रिंटिंग, डिझायनिंगचं काम बाळा अहिरेकर यांनी जीव तोडून केलं. प्रसंगी आपल्याकडे असलेल्या व्यावसायिक कामांकडेही दुर्लक्ष करत कॅलेंडरसाठी झोकून देत वेळ दिला. सकपाळ यांनीही कॅलेंडरच्या निर्मितीसाठी पाठबळ दिलं ते महत्त्वाचंच.

कॅलेंडरच्या प्रकाशनाचा क्षण मात्र माझ्याकडून हुकला, याची रुखरुख कायम राहील. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यव्यस्ततेमुळे अगदी दोन-तीन तासच आधी कळलं, की त्यांची वेळ मिळाली आहे अन् आजच (म्हणजे त्या दिवशी शनिवारी 11 तारखेला) प्रकाशन होणार आहे. मी ड्युटीवर होतो. त्यामुळे पोहोचणं शक्य झालं नाही. त्याची चुटपुट लागून राहिली. 99 धावांवर पोहोचल्यावर इनिंग संपली किंवा पाऊस पडला तर एखाद्या बॅट्समनला त्या क्षणी जे वाटेल तसेच भाव माझ्या मनात आले. काही गोष्टी तुमच्या नशिबात नसतातच. काही वेळा परिस्थितीमुळे तर काही वेळा काही माणसांमुळे. त्यामुळे त्याची खंत बाळगत बसलो तर कॅलेंडर साकारल्याचा, ते प्रत्यक्षात आल्याचा आनंद, समाधान गमावून बसेन. त्यामुळे मनामध्ये रुखरुख असली तरी माझ्या गिरगावच्या, नव्हे आपल्या गिरगावच्या या कॅलेंडरचा हा क्षण साजरा करण्याचंच ठरवलंय तुम्हा मंडळींच्या प्रतिक्रियांची, सूचनांची वाट पाहत.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Ramdas Kadam:  मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण?  : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Ramdas Kadam:  मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण?  : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Embed widget