एक्स्प्लोर

सर्व लेखक

1986 मध्ये स्थापन झालेले Dalal Street Investment Journal (DSIJ) हे भारतातील इक्विटी बाजारात दीर्घकाळापासून कार्यरत असलेले एक प्रतिष्ठित वित्तीय प्रकाशन आहे. अनेक दशकांच्या बाजारातील चढ-उतार, व्यवसाय चक्र आणि गुंतवणूक प्रवाहांचे निरीक्षण करत DSIJ ने संशोधन आणि विश्लेषणाची मजबूत परंपरा निर्माण केली आहे.  DSIJ ची गुंतवणूक पद्धती मूलभूत आर्थिक ताकद (Fundamental Strength) आणि किंमत हालचालींचे (Price Action) संतुलन साधण्यावर आधारित आहे. योग्य वेळ, जोखीम व्यवस्थापन आणि भांडवल संरक्षण यांना परताव्याइतकेच महत्त्व देत, DSIJ गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन प्रदान करते. ही संस्था शेअर बाजार, म्युच्युअल फंड, अर्थव्यवस्था आणि विविध गुंतवणूक धोरणांवर विश्लेषणात्मक माहिती उपलब्ध करून देते. विश्वासार्ह वित्तीय कंटेंट, संशोधनाधारित दृष्टिकोन आणि तज्ज्ञांच्या मतांमुळे DSIJ ने गुंतवणूकदार आणि बाजाराशी संबंधित वाचकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. Dalal Street Investment Journal हे SEBI नोंदणीकृत रिसर्च अॅनालिस्ट (INH000006396) असून, अल्पकालीन बाजारातील गोंधळापलीकडे जाऊन विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीवर भर देते.    
अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे. त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक नाशिक जिल्हा प्रतिनिधी

प्रेम शुक्ल राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत. याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे.  सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे. मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.
मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत. मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो. देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.
युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.  

रविंद्र कोकाटे, एबीपी माझा उत्तर रत्नागिरी, जिल्हा प्रतिनिधी

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे.  प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.  छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला  एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे  विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला.  कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या.  आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले  राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019 ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019 राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024  सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026 सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021 श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019 चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019 श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

वेदांत नेब Correspondent Reporter

सचिन पाटील हे मराठी डिजिटल पत्रकारितेतील एक अनुभवी नाव आहे. पत्रकारितेतील 16 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून प्रशासनापर्यंत, मनोरंजनापासून क्रीडा, व्यवसाय आणि लाईफस्टाईलपर्यंत विविध क्षेत्रांतील घडामोडींचा वेध घेतला आहे. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची जाण, तसेच शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांची सखोल समज, ही त्यांच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढलेले सचिन पाटील यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव. देशाच्या संरक्षणासाठी आपले सुपुत्र सैन्यात पाठवणाऱ्या या गावाला देशसेवेचा समृद्ध वारसा लाभला आहे. याच मातीतून आलेल्या सचिन यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बातमीकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन, विषयांचा सखोल अभ्यास आणि प्रेक्षकांना नेमके काय जाणून घ्यायचे आहे, याची अचूक जाण या बळावर त्यांनी डिजिटल पत्रकारितेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पारंपरिक पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करत डिजिटल माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेण्यावर त्यांचा भर राहिला आहे. सध्या ते एबीपी माझाचे संपादक (डिजिटल) म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली एबीपी माझाने मराठी डिजिटल न्यूज क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले आहे. बातमीचा वेग, आशयाची विश्वासार्हता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची व्यापक पोहोच यांचा मेळ साधत मराठी पत्रकारितेला डिजिटल विश्वात नवी उंची मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून मास कम्युनिकेशन | डिजीटल जर्नालिझममध्ये एक तप | प्रहार, एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी आणि पुन्हा एबीपी माझा असा आजवरचा डिजीटल जर्नालिझमचा प्रवास | टीव्ही 9 मराठी वेबसाईट डेव्हलपिंग, लॉचिंग ते नंबर वनपर्यंतची झेप | मराठी यूट्यूब व्हिडीओमध्ये महिन्याला 300M चा टप्पा गाठणाऱ्या पहिल्या टीमचं नेतृत्व | सध्या एबीपी माझा डिजीटल टीमची धुरा | कॉमस्कोर, गुगल आणि यूट्यूब अॅनालिटिक्समध्ये नंबर वन |  नवे प्रयोग करण्याला प्राधान्य, नवे पल्ले गाठण्याचा ध्यास | Passionate journalist with a track record of success in digital media. Currently serving as a Digital Editor, I've propelled ABP Majha's Webiste & YouTube channel to the number one spot, transitioning from Video Head to Digital Lead.  Managing a dynamic team of over 40+ professionals, my focus is on vertical growth, strategic social media planning, SEO implementation, and achieving target-oriented results.  Through teamwork and collaboration, my team successfully made ABP Majha's website rank number one in ComScore rankings, solidifying its digital dominance.  

सतिश केंगार एबीपी माझा, Copy Editor

सौरभ भोळे Senior Video Editor

प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मानसी राऊत

मानसी राऊत एबीपी माझा, असोशिएट प्रोड्यूसर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.  सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

व्हिडीओ

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Embed widget