Weekly Horoscope 3 June To 9 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 3 June To 9 June 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 3 June To 9 June 2024 : जून महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. धनु आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमच्यासाठी करिअरच्या अनेक संधी उघडतील, ज्यामुळे तुमचे यशाचे मार्ग मोकळे होतील. मात्र, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी स्थिर होईल. अविवाहित लोकांना लवकरच त्यांच्या आवडीची एखादी व्यक्ती मिळेल.
वृश्चिक रास (ScorpioWeekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तथापि, सर्व आव्हानांचा संयमाने सामना करा आणि तुमचं लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात तुमच्या घरातील वातावरण आनंददायी असेल, ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि खुश राहाल. लव्हबर्ड्समध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल आणि तुमची ट्यूनिंग चांगली राहील. व्यवसायात सुधारणा होईल आणि चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक समस्यांवर चर्चा होईल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात पैशाची आवक कायम राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांशी जास्त बोलणं टाळा. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील, पण कुणाशीही जास्त बोलू नका.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा सावधानता बाळगण्याचा राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आळस सोडावा लागेल. कशाचाही जास्त गर्व बाळगू नका. आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय सोडा. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराचा पाठिंबा नक्कीच मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधातील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही नवीन पुढाकार घेऊ शकता.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा भाग्याचा असेल. या आठवड्यात नशीब तुम्हाला साथ देईल. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही घेतलेला योग्य निर्णय तुमच्या यशाचं कारण बनेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कोर्टातील खटल्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. अविवाहित असाल तर लग्न ठरल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. जर तुम्ही आधीच कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यातून नफा मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार पूर्ण होतील. तुम्हाला परदेशात करिअर करायचं असेल तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. नोकरदार महिलांसाठी हा काळ चांगला राहील, उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: