एक्स्प्लोर

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : नवीन आठवडा सर्व 12 राशींसाठी कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने काही राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. तसेच, मित्राच्या साहाय्याने उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. कुटुंबा भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल पाहाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असणार आहे.तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्ही नियोजित केलेल्या कामासाठी तुम्हाला थोडी धावपळ आणि मेहनत करावी लागेल. तसेच, थोडा आर्थिक चणचणीचा देखील सामना करावा लागेल. नवीन आठवड्यात तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट देण्याचा देखील योग जुळून येणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा शुभकारक असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नियोजित केलेली कामे वळेत पूर्ण होतील. तसेच, तुम्ही या आठवड्यात फिरायला जाण्याची योजना देखील आखू शकता. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला एखादं नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात मन रमेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार आहे. या आठवड्यात कोणतेही काम घाईगडबडीत करू नका. अन्यथा,फायद्याच्या जागी नुकसान होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नियोजित केलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागू शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काहीसा आराम मिळेल. या काळात तुम्हाला मित्रांचं चांगलं सहकार्य मिळेल. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे वाढवायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कामाच्या बाबतीत तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. तसेच, उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल. जोडीदाराबरोबर सामंजस्याने व्यवहार कराल. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ ठरेल. तुमच्या करिअरशी संबंधित कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. घरात आनंदाने वेळ घालवाल.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शॉर्टकट टाळण्याचा असेल, अन्यथा काही नुकसान होऊ शकतं. प्रवासामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या प्रियकराला भेटण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नये. जर तुम्ही कोणतंही काम करण्याचा विचार करत असाल तर ते अर्धवट मनाने करू नका, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या काही चुकीमुळे तुमच्या बॉसचा ओरडा पडू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र जाईल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपावल्या जाऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक होऊ नये. राग बाजूला ठेवून कोणतंही काम करा. या आठवड्यात प्रियकरासोबत मतभेद होऊ शकतात.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु ही संधी तुमच्या हातून निसटू देऊ नका, जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकतं. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special ReportVare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget