Weekly Horoscope : चांगला की वाईट? मेष ते मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 25 To 31 August 2025 : ऑगस्टचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 25 To 31 August 2025 : ज्योतिष शास्त्रानुसा, ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना आपण गणरायासाठी समर्पित करतो. तसेच, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या स्वभावात थोडासा चिडचिडेपणा जाणवू शकतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नोकरीत तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामाना करावा लागेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात मनात शांती आणि चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव असतील. तसेच, तुमचं धैर्य वाढेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, भौतिक सुख सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. अशा वेळी आरोग्याची काळजी घ्या. हलगर्जीपणा अजिबात करु नका. तसेच, मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा आणि महत्त्वाचा असणार आहे. नवीन कार्यात अडथळे येऊ शकतात.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असेल. या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला नोकरीत बदली करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार योग्य ठरणार आहे.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. या काळात तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. तसेच, तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचा सहवास तुम्हाला भेटेल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. तसेच, धार्मिक कार्यातही तुमची रुची वाढेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. भावा-बहिणीतील नातं दृढ असेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीचं नवीन आठवड्यात मन अशांत असणार आहे. या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. आई-वडिलांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात आळसाचं वर्चस्व गाजवू देऊ नका. घरात तुमच्या धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीला नवीन आठवड्यात मानसिक शांती मिळेल. तुमच्या वाणीत मधुरता दिसून येईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा काहीसा लाभदायक ठरेल. मात्र, या आठवड्यात तुमच्यासमोर अनेक आव्हाने देखील येतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात परदेशात जाण्याचे योग जुळून येणार आहेत. तसेच, तुमच्या खर्चातही अचानकपणे वाढ होऊ शकते. कोणतंही नवीन आव्हान स्वीकारु नका. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















