Shani Gochar 2025 : अवघ्या 3 महिन्यांत शनीचं राशी परिवर्तन; 2025 मध्ये 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Shani Gochar 2025 : नवीन वर्षात शनि रास बदलून मीन राशीत प्रवेश करेल, त्याच्या या बदलत्या चालीचा मोठा फायदा 3 राशींना होणार आहे. या राशींकडे दीड वर्षात अमाप पैसा येईल.
Shani Rashi Parivartan 2025 : ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार, 2025 वर्ष हे खूप खास असणार आहे. नवीन वर्षात शनि (Shani Gochar 2025) तब्बल अडीच वर्षांनंतर आपली रास बदलणार आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होईल. शनि 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून बाहेर पडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल आणि 3 जून 2027 पर्यंत या राशीत राहील, त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल.
सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याचे शुभ-अशुभ प्रभाव दीर्घकाळ लोकांच्या जीवनावर राहतात. शनीच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर पडणार असला तरी काही राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणामुळे विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांचं नशीब पालटून त्यांना बक्कळ धनलाभ होईल आणि जीवनात सुख-समृद्धी नांदेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
शनीचा राशी बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. तुमच्या राशीच्या अकराव्या घरात शनि प्रवेश करेल. हे घर लाभ आणि इच्छा पूर्ण होण्याचं प्रतिक आहे. शनीच्या या स्थितीमुळे तुम्हाला हळूहळू चांगले लाभ मिळू शकतील. करिअर आणि व्यवसायात तुम्ही चांगलं यश मिळवू शकाल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. जे लोक व्यवसायात करतात त्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. येणारं वर्ष कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी आनंदाचं असेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 मध्ये शनीचं संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. मीन राशीतील शनीचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायद्याचं ठरेल. 29 मार्च 2025 नंतर शनिदेव तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यवसायासाठी केलेल्या योजना येत्या वर्षात यशस्वी होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. चांगल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होतील. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल.
मकर रास (Capricorn)
मीन राशीतील शनीचं संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आणि भाग्याचं असेल. शनिदेव तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात प्रवेश करेल. 2025 मध्ये शनीने कुंभ रास सोडल्यामुळे मकर राशीच्या लोकांवरील शनीची साडेसाती दूर होईल. साडेसाती संपल्याने तुमच्या अपूर्ण कामांना गती मिळेल आणि नशीब तुमच्या पाठीशी राहील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील आणि कर्जातून मुक्ती मिळेल. नोकरीत पगार वाढण्याची आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Baba Venga : नवीन वर्षात 'या' 4 राशींचं नशीब पालटणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित