Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : नवीन महिन्यासोबत नवीन आठवडा लवकरच सुरू होणार आहे. ऑक्टोबरचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया
मेष रास (Aries Weekly Horoscope)
टॅरो कार्ड्सनुसार, मेष राशीचे लोक या आठवड्यात काम आणि आर्थिक गोष्टींच्या दबावामुळे खूप तणावात असू शकतात. यामुळे या आठवड्यात तुम्ही दु:खी किंवा निराश होऊ शकता. विश्रांतीसाठी वेळ काढणं आणि स्वतःकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभाचे संकेत आहेत. व्यवसायात तुम्हाला भरघोस नफा मिळेल. एकंदरीत तुमचा नवीन आठवडा सकारात्मक राहील.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांच्या पदरी नवीन आठवड्यात निराशा पडेल, कारण इतर लोक तुमच्या सूचनांचं पालन करणार नाहीत, ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांना नोकरीत ज्या पदोन्नतीची अपेक्षा होती ती या आठवड्यात नक्कीच येईल, तसंच कामातही नाव होईल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात काही किरकोळ आजाराच्या समस्या उद्भवतील, परंतु आठवड्याच्या शेवटी सर्वकाही ठीक होईल. कोणतीही निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या जोडीदारासोबत मनातील विचार शेअर केल्याने नातं मजबूत होईल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात पचनाच्या समस्या असू शकतात, म्हणून त्यांना त्यांच्या आहारात फळं आणि दही समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. आर्थिक चणचण आठवड्याच्या शेवटी दूर होईल. या आठवड्यात तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देईल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल, ज्यामुळे ते आठवडाभर थकलेले दिसतील. कन्या राशीच्या लोकांनी त्यांची गरज ओळखणं आवश्यक आहे. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण सुखाचं राहील.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात पाठदुखीची समस्या जाणवेल. अंगदुखी टाळण्यासाठी दररोज स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात तुमची प्रगती होईल, नोकरी-व्यवसायात चांगले परिणाम मिळतील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना अतिविचारामुळे या आठवड्यात डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी थोडी विश्रांती घ्यावी आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. कामाच्या ठिकाणी वेळेवर निर्णय घेऊन ते प्रगती करू शकतात. उत्तम संधी शोधून उत्तम करिअर निवडू शकतात.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीचे लोक या आठवड्यात खूप काम करतील. तुमचं आरोग्य या काळात सुधारलेलं दिसेल. मात्र, आव्हानात्मक परिस्थितीशी सुरू असलेल्या संघर्षामुळे तुम्ही खचून जाल. सर्व काही मागे राहिल्यासारखं तुम्हाला वाटेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात काही आरोग्याच्या समस्या जाणवतील, तुम्ही आजारी पडू शकता. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील, तुम्हाला लवकरच बढती आणि नोकरीच्या बदलीची बातमी मिळू शकते.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांनी पोटाच्या समस्या टाळण्यासाठी कॅफिनचं सेवन कमी केलं पाहिजे, त्यांनी दररोज दोन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. या आठवड्यात कोणीतरी तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू शकतं. सावध राहा आणि लोकांचे खरे हेतू जाणून घ्या.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांना खूप आनंद आणि एकूणच समाधान मिळेल, ते अधिक उत्साही आणि सक्रिय वाटतील. आव्हानात्मक वाटणारी परिस्थिती असली तरी ते धीराने त्यांचा सामना करतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :