एक्स्प्लोर

Weekly Horoscope (11 April to 17 April 2022) : या आठवड्यात बदलणार ग्रहांच्या राशी, सगळ्यांवर होणार परिणाम! जाणून घ्या या आठवड्याचं राशीभविष्य...

Weekly Horoscope 11 April to 17 April 2022: मिथुन, तूळ, मकर राशीसह सर्व राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य...

Weekly Horoscope 11 April to 17 April 2022: सोमवारपासून नवीन आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा बाराही राशींसाठी खास असणार आहे. चैत्र महिना चालू आहे. दशमीपासून नवीन आठवडा सुरू होत आहे. या आठवड्यात राहू, केतू आणि गुरूच्या राशी बदलत आहेत. मेष ते मीन राशीच्या लोकांवर ग्रहांच्या हालचालींचा परिणाम होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल, जाणून घेऊया...

मेष (Aries Horoscope) : जर तुम्ही या आठवड्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आठवड्याच्या मध्यानंतर ते करणे अधिक फायदेशीर ठरेल. मेहनतीला नशिबाने साथ दिल्याने चांगले फळ मिळेल. आयटी आणि सॉफ्टवेअरशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी आठवडा खूप व्यस्त असेल. परंतु, इतरांसाठी परिस्थिती सामान्य असेल. तरुणांना नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करण्याचा सल्ला दिला जात आहे. यकृताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, आणखी काही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्भवती महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक परिस्थिती व्यस्त राहील, कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या कामात व्यस्त राहतील. या काळात मोठ्या भावाच्या खर्चात वाढ होताना दिसेल.

वृषभ (Taurus Horoscope) : या आठवड्यात ग्रहांची स्थिती कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढवेल. त्यामुळे कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका. छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल चिडचिड होऊ शकते, परंतु तुम्हाला खूप शांतपणे काम करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वैद्यक क्षेत्रातील लोकांना कठोर परिश्रमासोबत नवीन संधी मिळतील. या वेळी, व्यवसायात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकते. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. थंड वस्तूंचे सेवन करणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. जास्त ताण घेऊ नका. सामाजिक आणि घरगुती वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील.

मिथुन (Gemini Horoscope) : या आठवड्यात तुम्हाला तुमचे नेटवर्क वाढवावे लागेल. ज्या लोकांशी बरेच दिवस बोलला नाहीत, त्यांना कॉल करा आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा. करिअरबाबत नवीन योजना करा. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांनी या आठवड्यात आपल्या रणनीतीवर फेरविचार करा आणि नव्या पद्धतीने योजना करा. फुफ्फुसाशी संबंधित समस्यांबाबत सतर्क राहावे लागेल. प्रदूषणापासून दूर राहिले पाहिजे. धूम्रपान करत असाल, तर तुम्ही ताबडतोब सोडले पाहिजे. मुलाच्या शिक्षणाबाबत काही चिंता असू शकते. या काळात वेळ काढून मुलांना मार्गदर्शन करणे उत्तम ठरेल.

कर्क (Cancer Horoscope) : या आठवड्यात ज्येष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. कार्यक्षेत्रात एखादी नवी जबाबदारी मिळेल, ती आनंदाने स्वीकारली पाहिजे. व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही नवीन योजना तयार करू शकता, तुमचे भागीदार तुमच्या योजना अंमलात आणण्यासाठी तुमचे समर्थन करतील. ग्राहक त्यांच्या थकबाकीचे पैसे देऊ शकतात, ज्यामुळे व्यवसायात चालू असलेल्या आर्थिक समस्यांचे निराकरण होईल. आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रात्री लवकर झोपणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांच्या वागणुकीकडे लक्ष द्या.

सिंह (Leo Horoscope) : या आठवड्यात तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मेहनत करावी लागेल. बुद्धीचा वापर करावा लागेल, नवीन योजना नव्या पद्धतीने तयार कराव्या लागतील. ऑफिसमध्ये तुम्ही जेवढे क्रिएटिव्ह काम कराल, तेवढे ते फायदेशीर ठरेल. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासात कोणतीही हलगर्जीपणा करू नये, विशेषत: लष्करी विभागात जाण्याची तयारी करणाऱ्यांनी...या आठवड्यात नोकरीच्या बाबतीत काही चिंताजनक परिस्थिती असू शकते, परंतु जे घरून काम करत आहेत त्यांनाही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. पाठदुखी आणि पाठीशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही चिंतित होऊ शकता. कौटुंबिक परिस्थिती सामान्य राहील. भाऊ-बहिणीमध्ये मतभेद होऊ नयेत.

कन्या (Virgo Horoscope) : या आठवड्यात तुम्हाला कठोर परिश्रमानंतर लाभ मिळेल. कामात लक्ष द्या. थोडा थकवाही जाणवेल. हा आठवडा व्यवसायासाठी छोटे बदल घडवून आणेल, दुसरीकडे व्यवसायाबाबत काही चिंता असू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल जाणार आहे, तुम्हाला वाचन-लेखन करावेसे वाटेल. परदेशी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. वेगाने गाडी चालवत असाल, तर काळजी घ्या. नियमानुसार वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवावे. उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे. भरपूर सूर्यप्रकाशात काम करायचे असेल, तर छत्री आणि टोपीचा वापर करावा. जोडीदाराला एखाद्या गोष्टीचा राग येऊ शकतो.

तूळ (Libra Horoscope) : या आठवड्यात नियम बनवण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. काम वेळेत पूर्ण होण्यातही साशंकता आहे, त्यामुळे प्रत्येक काम वेळेवर व्हावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. लवकर झोपणे आणि लवकर उठणे आरोग्यासाठी उत्तम राहील, त्याचे काटेकोरपणे पालन करा. जे लोक कोर्टात काम करतात, त्यांनी आपले कौशल्य वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे. जास्त मानसिक तणावाचा आरोग्यावर परिणाम होतो. कधी-कधी जास्त मत्सर ठेवल्याने आरोग्यातही समस्या निर्माण होतात. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. जर, या राशीच्या लोकांची मुलगी लहान असेल तर तिच्याशी बसून संवाद साधा, असे केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : या आठवड्यात उत्पन्न वाढवण्याची योजना आखावी लागेल. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे, त्यांना गुरुच्या कृपेने या विचित्र परिस्थितीतही चांगली नोकरी मिळू शकते. व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आठवडा महत्त्वाचा आहे. आरोग्याविषयी बोलायचे झाले, तर हातांची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही कोणत्याही प्लांट किंवा कारखान्यात काम करत असाल, तर जास्त काळजी घेतली पाहिजे. ज्यांच्या हाताला आधीच कोणतीही समस्या आहे किंवा त्यांच्या हाताला आधी फ्रॅक्चर झाले आहे, त्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी. कुटुंबातील सदस्यांशी किरकोळ कारणावरून मतभेद होतील. पण, मन मोठे असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

धनु (Sagittarius Horoscope) : जे लोक काहीसे अंतर्मुख स्वभावाचे आहेत, त्यांच्यासाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. ग्रहांची स्थिती त्यांना बहिर्मुख बनवू शकते. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वासच यश मिळवून देईल. आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना सतर्क राहावे लागेल. सरकारी खात्यांशी संबंधित लोकांनी आपल्या कामात मेहनत घ्यावी. सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांना या आठवड्यात सतर्क राहावे लागेल, तसेच काळजी घ्यावी लागेल, गुडघ्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे पहिले दोन दिवस आईच्या तब्येतीची काळजी घ्या, ती आधीच आजारी असेल, तर अधिक सतर्क राहा.

मकर (Capricorn Horoscope) : या आठवड्यात खर्चात कपात करण्याची वेळ आहे. आठवडाभरात काही आर्थिक अडचणीत येऊ शकतात. करिअरबद्दल बोलायचे झाले तर, सध्या देशात सुरू असलेल्या परिस्थितीनुसार पदोन्नतीची शक्यता कमी आहे, परंतु ग्रहांची स्थिती वाढीचा घटक आहे, नोकरीमध्ये स्थिरता राखण्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला राहील. मात्र, जास्त कर्ज घेतल्याने तुमचे पैसे अडकू शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिले तीन दिवस चांगले राहतील, त्यानंतर डोकेदुखीसारख्या सामान्य समस्या उद्भवू शकतात. कौटुंबिक परिस्थिती आनंदाने भरलेली असेल, ज्या घरांमध्ये लहान मुले असतील तेथे आनंदाचा अधिक संचार होईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : या आठवड्यात तुम्हाला कामासोबतच काही पूजा-अर्चना करणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन रणनीती बनवताना त्यांच्या कामाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. त्याचबरोबर जे व्यवसाय करत आहेत, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. व्यवसायात सुरू असलेल्या राजकारणाबाबतही सतर्क राहावे लागेल. कोणाशीही वाद घालू नका. उच्च रक्तदाबाची समस्या अशा लोकांना त्रास देऊ शकते, ज्यांना आधीच उच्च रक्तदाब आहे, त्यांनी यावेळी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे आरोग्य बिघडू शकते, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन (Pisces Horoscope) : या आठवड्याच्या सुरुवातीला दुखापतीची संभावना आहे. ही दुखापत आर्थिकही असू शकते, त्यामुळे शारीरिक आणि आर्थिक अशा दोन्ही बाबतीत काळजी घ्या. कामाचा दबाव खूप जास्त असेल. व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. हृदयरोगींना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक वातावरण थोडे नरम राहील, जोडीदारासोबत तणाव असेल तसेच वडीलही रागावतील, त्यामुळे या आठवड्यात घरातील वातावरण थंड ठेवावे लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget