एक्स्प्लोर

Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 1-7 April 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 1-7 April 2024 : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. तूळ आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. एप्रिलचा नवीन आठवडा (1 April To 7 April Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा भाग्याचा असेल. या आठवड्यात तुमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडतील. तुमचे विरोधक तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात तुम्हाला विविध सुखसोयी मिळू शकतात. तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती प्रवेश करेल. तुमच्या आवडीप्रमाणे जोडीदार मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मोठे निर्णय घेणं टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल.ऑफिसमध्ये कामाचा ताण अचानक वाढू शकतो. लोकांशी कामाची कोणतीही प्लॅनिंग शेअर करू नका. आठवड्याच्या मध्यात तुम्ही काही सिक्रेट स्ट्रॅटेजी बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात मदत होईल. या आठवड्यात तुमचं बजेट बिघडू शकतं. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अचानक एखादे काम पूर्ण झालं तर तुम्ही आनंदी व्हाल. नवीन आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीचे लोक या आठवड्यात थोडे व्यस्त राहतील. या आठवड्यात तुमच्या कामात अनेक बदल होऊ शकतात, तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवास संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्या, इजा होण्याची शक्यता आहे. नवीन आठवड्यात ़ तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता. नोकरदारांना आर्थिक लाभ होईल, खर्चात थोडी वाढ होईल. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले असतील.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. मित्र आणि कुटुंबीयांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्ही या आठवड्यात प्लॅन करू शकता. या आठवड्यात तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. तुम्हाला इतर ठिकाणाहून मोठी नोकरीची ऑफर मिळू शकते, ती स्वीकारताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल. नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल.

कुंभ रास (Aquarius)

नवीन आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तम राहील. या आठवड्यात प्रत्येक काम करताना तुम्हाला जास्त डोकं लावावं लागेल. कोणताही मोठा व्यवहार करताना तुम्हाला कागदपत्रांशी संबंधित काम अतिशय काळजीपूर्वक करावं लागेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना तुम्ही आखू शकता. नवीन आठवड्यात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अचानक एखादे काम पूर्ण झालं तर तुम्ही आनंदी व्हाल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य राहील. तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला भाऊ-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची दिनचर्या आणि आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामात कोणी अडथळा आणू शकतो, त्यामुळे सावध रहा. प्रियकर तुमच्या भावनांचा आदर करेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल, परस्पर तणाव दूर होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget