Weekly Horoscope 08 July To 14 July : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 08 July To 14 July : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने, मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 08 July To 14 July : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृषभ आणि कन्यासह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील, या काळात तुम्हाला नफा आणि यश मिळेल. तुमच्या आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात, ज्या तुमच्यासाठी वेदनादायक असतील. धन आणि मान हानी होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रेमसंबंधात प्रत्येक पाऊल सावधपणे उचला.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. हा काळ आनंदाचा असेल आणि तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मालमत्तेच्या कामात दीर्घकाळ चाललेल्या अडचणी दूर होतील. या आठवड्यात तुम्ही काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. आरोग्य सामान्य राहील.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्हाला नोकरी शोधायची असेल तर या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या गुंतवणुकीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळा. या आठवड्यात नोकरदार लोकांना त्यांचं लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचा आळस आणि तुमचा गर्व तुम्हाला त्रास देऊ शकतो. लव्ह लाईफमधील एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कठीण जाईल. या आठवड्यात तुमच्याकडे खूप काम असेल. तुम्हाला फार तणाव जाणवेल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या विरोधकांना मागे टाकायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. भागीदारी व्यवसायात तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला काही कामात यश मिळेल. जर तुम्हाला परदेशात करिअर करायचं असेल, तर या दिशेने तुमच्यासमोरचे मोठे अडथळे दूर होतील. तुमच्या प्रियकराशी तुमचं नातं मधुर राहील. या आठवड्यात तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :