Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : नवीन वर्ष 2025 सुरु झालं आहे. लवकरच दुसऱ्या आठवड्यालाही सुरुवात होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आरोग्याच्या बाबतीत चांगला असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय देखील चांगला चालेल. तसेच, आठवड्याची सुरुवात चांगली झाल्याने तुमची मानसिक स्थितीही चांगली राहील. वैवाहिक नात्यात गोडवा टिकून राहील. तुमच्या करिअरशी संबंधित तुम्ही मोठा निर्णय या आठवड्यात घेऊ शकता. अशा वेळी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात अनेक छोटे-मोठे आजार होऊ शकतात. याचा तुम्ही नीट सामना करायला हवा. तसेच, जर तुम्हाला एखादी नवीन वस्तूची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा चांगला आहे. तुमचा आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. तसेच, नियमित व्यायाम करा.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यवान असणार आहे. या आठवड्यात सरकारी योजनेचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुमचा व्यवसाय देखील सुरळीत सुरु राहील. तुम्हाला कसलीच चिंता भासणार नाही.महिलांनी मात्र, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला नोकरीच्या संबंधित शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या नवीन लोकांशी गाठीभेटी होतील. यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. नाक, कान, घशाच्या संबंधित आजार उद्बवू शकतात. याकडे दुर्लक्ष करु नका.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सामान्य असणार आहे. या काळात आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत खूप चिंता सतावेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. अशा वेळी खचून न जाता आलेल्या परिस्थितीचा धैर्याने सामना करा.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तसेच, व्यवसायाशी संबंधित तुम्हाला चढ-उतार जाणवू शकतात. त्यामुळे या आठवड्यात कोणतीच जोखीम घेऊ नका. जर तुम्हाला पैसे गुंतवणुकीच्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर तज्ज्ञांशी संपर्क साधा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :