Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचे संकेत
Weekly Lucky Zodiacs 02 September To 08 September : सप्टेंबरचा पहिला आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
Weekly Horoscope 02 September To 08 September Lucky Zodiacs : सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 2 सप्टेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात गजकेसरी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा खूप शुभ राहील आणि त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल. या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात जे काही प्रयत्न कराल ते यशस्वी होतील. व्यवसायाशी निगडीत लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. तसेच, नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत होते, त्यांना नवीन संधी मिळतील. कोर्टात प्रलंबित प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंददायी वेळ घालवणार आहात. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला हितचिंतकांच्या मदतीने नियोजित सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्याशी चांगलं वागतील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्हाला पूर्वी केलेल्या कामासाठी सन्मानित केलं जाऊ शकतं. परदेशात बिझनेस करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे, अशा लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, जर तुम्ही परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या दिशेने मोठं यश मिळू शकतं.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा खूप भाग्याचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर बरंच काही साध्य कराल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. यश मिळवल्यानंतर अति उत्साही होणं टाळा. इतरांचा अपमान टाळा, अन्यथा तुमचे स्वतःचे हितचिंतक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल. विवाहितांसाठी काळ खूप आनंदाचा जाणार आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा फायदेशीर ठरेल. हा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्याचा असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, करियर आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही जे काही प्रवास कराल ते शुभ आणि फायदेशीर सिद्ध होणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात खूप मदत होईल. नोकरदार महिलांना करिअरमध्ये काही मोठं यश मिळू शकतं. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधीही मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा चांगला राहील. वृश्चिक राशीचे लोक आपली सर्व कामं वेळेवर करण्यात यशस्वी होतील. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कोणत्याही प्रयत्नात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि समाजात तुमचा सन्मान वाढेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ प्रशंसा करतील. हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. या राशीचे लोक जे अनेक दिवसांपासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठीही सप्टेंबर महिना चांगला जाणार आहे. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा आणि खूप सन्मान मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: