एक्स्प्लोर

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या 5 राशींसाठी ठरणार खास; 2 सप्टेंबरपासून लखलखणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Astrology Somvati Amavasya 2024 : श्रावणातील सोमवती अमावस्या काही राशींसाठी खास ठरणार आहे. सोमवती अमावस्येपासून 5 राशींना सोन्याचे दिवस येणार आहे, त्यांच्या धन-संपत्तीत देखील वाढ होईल.

Astrology 02 September 2024 : यंदा श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून झाली आणि शेवट देखील सोमवारी झाला. या काळात काही राशींना महादेवाची विशेष कृपा लाभली. श्रावणात शिव योगासह अनेक शुभ योग जुळून आले होते, ज्याचा फायदा पुढे 5 राशींना होणार आहे. यानुसार 2 सप्टेंबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्साहाचा असेल. वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि त्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती साधू शकाल आणि अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्हाला दिलासा मिळेल. सासरच्या लोकांमध्ये काही गैरसमज चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 

कर्क रास (Cancer)

कर्क राशीसाठी हा काळ चांगला असेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवले तर तुम्हाला भविष्यात दुप्पट नफा मिळेल, ज्यामुळे तुमची भविष्याची चिंता कमी होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने लोकप्रियता आणि आदर वाढेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि नफाही होईल. तुम्हाला प्रत्येक पावलावर भावा-बहिणीची मदत मिळेल, ज्यामुळे घरातील कामं सहज पूर्ण होतील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमधील संबंधही चांगले राहतील.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आज महादेवाच्या कृपेने पूर्ण होतील. तुम्हाला संपत्ती आणि वाहन सुख मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून काळ चांगला जाईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. कुटुंबात काही तणाव किंवा गैरसमज चालू असतील तर ते आज दूर होतील आणि सर्व सदस्य एकमेकांना कामात मदत करण्यासाठी पुढे येतील.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना भगवान शंकराच्या कृपेने अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक ग्राहकांमध्ये व्यस्त राहतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते तुमच्या भावांच्या मदतीने सहज पूर्ण होईल. तसेच या राशीचे लोक ज्यांना परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांचा हा काळ आनंददायी असणार आहे. मीन राशीचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचा तुमच्या भावांसोबत काही वाद होत असेल तर तो संपेल आणि सर्व प्रकारचे गैरसमजही दूर होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते कार्यालयीन कामं वेळेवर पूर्ण करतील आणि मजेदार मूडमध्ये दिसतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Numerology : अतिशय तापट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; अगदी क्षणात होतात हायपर, नेहमी नाकाच्या शेंड्यावर असतो राग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Embed widget