एक्स्प्लोर

Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : ना कसली कटकट, ना कसला ताण; 'या' राशींचा नवीन आठवडा सुखाचा, वाचा सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : काही राशींसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना करू शकता. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून काही चांगली बातमी मिळू शकते. मुलांशी संबंधित कोणताही मोठा तणाव दूर होईल, ज्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात आराम मिळेल.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

आठवड्याच्या सुरुवातीला वृषभ राशीच्या लोकांसोबत काही वाईट घडू शकतं, त्यामुळे काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा करू नका. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. प्रियकरासोबत वीकेंडचा आनंद घ्याल. तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना काहीतरी तडजोड करावी लागेल. ऑफिसमधील टीमचा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मालमत्तेच्या वादात लोक तुमची मदत घेऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत असाल.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांचे करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल आणि आणखी नवीन संधीही मिळू शकतात. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत छान क्षण घालवू शकाल. तुमचं आरोग्य सामान्य राहील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी नीटपणे वागाल, नवीन आठवड्यात तुमच्या व्यवसायात वाढ होईल. प्रियकरासोबत प्रेमसंबंध मजबूत होतील. परंतु या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या, जुने आजार परत येऊ शकतात.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधांची चांगली काळजी घ्या. कुटुंबात काही कारणावरून वाद होऊ शकतात. जोडीदाराला तुम्ही एका आलिशान स्पा रिसॉर्टमध्ये घेऊन जाऊ शकता, यामुळे तुमचं नातं आणखी घट्ट होऊ शकतं. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. जर तुम्हाला या आठवड्यात नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, नवीन व्यवसाय जर तुम्हाला स्थापन करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही योजना आखू शकता. तसेच, नवीन आठवडा हा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा खास असणार आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करु शकता. जर तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच पैशांची बचत करा. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, एखाद्या धार्मिक स्थळाला देखील तुम्ही भेट देऊ शकता. या काळात मित्रांचा सहवास तुम्हाला लाभेल. त्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला फार छान वाटेल. तसेच, कुटुंबातील वातावरण प्रसन्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, मित्र-मंडळींबरोबर तुम्ही अनेक गोष्टी शेअर करु शकता. आठवड्याच्या ठेवटी कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणाव जाणवेल. यासाठीच तुम्ही नियमित योग आणि व्यायाम, ध्यान करण्यास सुरुवात करा. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संकटांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एका पाठोपाठ संकटांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. मात्र, अशा वेळी खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट बघा. एक दिवस तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हालास काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल तर त्यात तुमचं मन रमेल. नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासू वृत्ती दिसून येईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Numerology : अतिशय तापट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; अगदी क्षणात होतात हायपर, नेहमी नाकाच्या शेंड्यावर असतो राग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Embed widget