एक्स्प्लोर
Numerology : अतिशय तापट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; अगदी क्षणात होतात हायपर, नेहमी नाकाच्या शेंड्यावर असतो राग
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार तापट असतात, यांना कुठल्याही गोष्टीचा राग एकदम पटकन येतो आणि त्यावरुन ते समोरच्यावर लगेच भडकतात.

Numerology mulank 9 people
1/10

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 9 असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे.
2/10

मूलांक 9 चे लोक खूप धैर्यवान असतात, त्याच बरोबर त्यांचा स्वभाव खूप तापट असतो. त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर नेहमी राग असतो.
3/10

अंकशास्त्रानुसार, मूलांक 9 च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळाच्या वर्चस्वामुळे 9 मूलांकाचे लोक खूप तापट असतात.
4/10

या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो. एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात. एखाद्या माणसाचं बोलणं, वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खावून येतात.
5/10

या लोकांचा स्वभावच मूळात तापट असतो, त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
6/10

मूलांक 9 चे लोक अतिशय निर्भय आणि धाडसी स्वभावाचे असतात. ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात. मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यामध्ये हे गुण असतात.
7/10

या लोकांमध्ये आत्मविश्वास कसून भरलेला असतो. कोणतीही जोखीम घ्यायला ते अजिबात घाबरत नाहीत.
8/10

अंकशास्त्रानुसार, 9 मूलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडते. त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात.
9/10

मूलांक 9 चे लोक शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात. कोणताही विषय आत्मसात करण्याची चांगली क्षमता त्यांच्यात असते.
10/10

कला आणि विज्ञानात या लोकांना चांगली रुची असते.
Published at : 27 Aug 2024 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
