एक्स्प्लोर

Weekly Horoscope 01 May to 07 May 2023 : हा आठवडा 'या' राशींसाठी भाग्याचा असणार; जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 01 May to 07 May 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 01 May to 07 May 2023 : मे महिन्यातील हा पहिला आठवडा मेष, मिथुन, वृश्चिक राशींसाठी चांगला जाणर आहे. तर, कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीसाठी नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली आहे. तुमचं प्रेम जीवन चांगलं राहील. तुमच्या नात्यात अधिक जवळीक वाढून तुम्ही कुटुंबीयांकडे आपल्या जोडीदाराबाबत चर्चा करू शकता. आपल्या जोडीदाराची भेट घडवून देऊ शकता. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होईल. पैशांचा वापर जरा जपून करा. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात, स्वतःची काळजी घ्या. नोकरीत तुमची बाजू चांगली राहील. सर्वजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला चिंता, तणाव जाणवेल. जोडीदाराबरोबरही वाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ 

वृषभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या घरातील जबाबदाऱ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. घरासाठी लागणाऱ्या वस्तू आणतील. तुमचे मन नोकरीत गुंतून राहील. आठवड्याच्या मध्यात नोकरीत बदल होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचं प्रेम जीवन सुखी राहील. नात्याला चांगला वेळ देता येईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काहींना अस्वस्थ वाटेल. नवीन गुंतवणुकीचा विचार तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली राहील. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे घेऊन जाईल. प्रत्येक काम मनापासून करण्याची तुमची इच्छा होईल. वडीलांकडून तुमच्या मनाविरूद्ध गोष्टी घडतील, पण मनावर घेऊ नका. भावंडांशी प्रेमाने वागा. आठवड्याच्या मध्यात घरी पूर्ण वेळ द्याल आणि नोकरीही प्रामाणिकपणे कराल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन चागले राहील. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.  

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली आहे. उत्पन्नात चांगली वाढ होईल. काही रक्कम बँकेत जमा करता येईल. रिअल इस्टेटच्या कामात तुम्हाला फायदा होईल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता. या आठवड्यात तुमची दान करण्याची इच्छा होईल. ज्यामुळे तुमच्या मनाला मानसिक शांतता मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात कुटुंबातील सदस्याच्या कमजोर आरोग्यामुळे तुमचं मन उदास होऊ शकते. कामात यश मिळेल पण आरोग्याचीही काळजी घ्या.

सिंह 

सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील, परंतु कौटुंबिक जीवनात काही तणाव असेल. तुमच्या जोडीदाराला मानसिक त्रास जाणवेल. अशात तुम्ही त्यांना साथ द्यावी. व्यवसायात बरकत येईल. आठवड्याच्या मध्यात विनाकारण काळजी करणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. सासरच्या लोकांकडून धनलाभ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांसोबत काही नवीन कामावर चर्चा होईल. प्रवासाचा योग येऊ शकतो. 

कन्या 

कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला काहीसे चिंतेत राहतील. आरोग्याच्या बाबतीत अनेक तक्रारी जाणवतील. खर्च जास्त होतील, त्यामुळे तणाव निर्माण होईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल. व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. नोकरीतही परिस्थिती चांगली राहील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कौटुंबिक तणाव असेल पण उत्पन्न चांगले राहील आणि तुम्ही काही खास कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

तूळ 

तूळ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाचा लाभ मिळेल. तुमच्या प्रेम जीवनात प्रेम वाढेल. तुमच्या प्रियकरासह तुमची केमिस्ट्री सुधारण्यासाठी तुम्हाला नवीन कल्पना सापडतील. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. या आठवड्यात तुम्हाला पोटातही दुखू शकते. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत यश मिळेल. तसेच, जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीही मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तब्येतीत अशक्तपणा राहील, परंतु घरगुती जीवनात प्रेम राहील. तुमच्या व्यवसायातही चांगली प्रगती होईल.  

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांना आपल्या चांगल्या कामाचे फळ आठवड्याच्या सुरुवातीलाच मिळेल. तुमचं सगळीकडून कौतुक होईल. तुमचा बॉसही तुमच्यावर खूश असेल. घरातही तुम्ही कौटुंबिक गरजांकडे लक्ष द्याल आणि जबाबदाऱ्या पार पाडाल. आठवड्याच्या मध्यात तुमचे पूर्ण लक्ष प्रेम जीवनावर असेल आणि त्यात तुमची केमिस्ट्री तुमच्या प्रियकरापेक्षा चांगली असेल. तुमचे उत्पन्नही चांगले राहील. काळजी करण्याची काहीही गरज भासणार नाही. हा आठवडा तुमचा पूर्णपणे आनंददायी असणार आहे. फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा मानसिक तणाव वाढेल आणि तब्येत थोडीशी बिघडू शकते. खर्चही वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली आहे. अचानक तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला आनंदाची बातमी मिळू शकते. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. भगवान शंकराच्या उपासनेत तुम्ही अधिक मग्न असाल. आठवड्याच्या मध्यात, नोकरीच्या बाबतीत तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक सहकार्य तुमच्या सोबत राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरात लवकरच लग्नाची चर्चा सुरू होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काही तणाव असेल. उत्पन्न कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित कराल परंतु प्रेम जीवनात समाधानी राहाल.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात काहीशी कमजोर असेल. तुमच्या आरोग्यात मानसिक तणाव राहील. घरातील एखाद्या गोष्टीवरून तुम्ही सतत विचारात असाल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला दूर प्रवास करण्याचा योग येईल. मंदिरात तसेच धार्मिक स्थळांना भेट द्यावीशी वाटेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत नोकरीत काही अडचणी येतील. हरकत नाही. कौटुंबिक वातावरण काहीसे अशांत असेल, परंतु तुम्ही समजूतदारपणा दाखवाल.

कुंभ

कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या घरगुती जीवनाचा आनंद घेतील. आपल्या मनातील सर्व काही इच्छा, आकांशा, भावना ते आपल्या जोडीदाराली सांगतील. तसेच, व्यवसायात काही नवीन करण्याची योजना आखाल. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. शारीरिकदृष्ट्या कोणताही त्रास, वेदना जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत धार्मिक यात्रा करण्याचा योग येऊ शकतो. वडिलांशी एखाद्या कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात काहीशी कमजोर असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातील तुमची तब्येत काहीशी बिघडू शकते. तुमचं मन अस्वस्थ होईल. कोणताही मोठा खर्च आणि एखाद्याच्या आरोग्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. आठवड्याच्या मध्यात चांगला काळ जाईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्येतीत चढ-उतार दिसतील आरोग्याची काळजी घ्या. पण कुटुंबात आनंद राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3 May 2023 : मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्याCabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Embed widget