Virgo Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : कन्या राशीच्या लोकांनी मोठ्या बदलासाठी राहा तयार; ऑफिसचा व्याप वाढणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Virgo Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...
Virgo Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आता होत आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा कन्या राशीसाठी नेमका कसा असणार? कन्या राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)
तुमची लव्ह लाईफ आनंदी राहील. तुमच्या पालकांच्या पाठिंब्याने तुमचं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रियकराला लग्नासाठी प्रपोज करू शकता. विवाहित लोकांनी ऑफिस रोमान्सपासून दूर राहावं. काही महिलांना त्यांच्या जोडीदाराच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)
कार्यालयीन कामात किरकोळ अडचणी येतील, ज्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. काडी व्यावसायिकांना दिलेल्या मुदतीमध्ये काम करणं कठीण जाईल. कलाकार, चित्रकार आणि संगीतकारांसाठी हा आठवडा संधींनी परिपूर्ण असेल. आठवड्याचे शेवटचे 3-4 दिवस नोकरीच्या मुलाखतींसाठी चांगले राहतील. नवीन भागीदारी करताना थोडं सावध राहा. व्यावसायिकांनी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणं टाळावं. नवीन व्यवसायात सध्या गुंतवणूक करू नये.
कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)
आर्थिक बाबतीत फार अडचणी येणार नाहीत. या आठवड्यात तुम्ही तुमच्या भावंडांसोबत पैशांबाबत सुरू असलेले वाद मिटवण्याचा प्रयत्न करू शकता. उद्योगपतींना परदेशात व्यवसाय विस्तारासाठी निधी मिळू शकतो. या आठवड्यात तुम्ही तुमच्या घराची दुरुस्ती करू शकता किंवा घरगुती उपकरणं खरेदी करू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.
कन्या राशीचे आरोग्य (Virgo Health Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला जास्त आरोग्याच्या समस्या जाणवणार नाहीत. या आठवड्यात स्किन इन्फेक्शन किंवा घसा दुखण्याची समस्या देखील जाणवू शकते. कन्या राशीच्या गर्भवती महिलांना दुचाकी वाहनावरून प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागेल. खेळताना मुलांना दुखापत होऊ शकते, परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: