Shukra Parivartan 2023 : शुक्र आज रात्री करणार सिंह राशीत प्रवेश, 'या' राशींचे भाग्य चमकणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Shukra Parivartan 2023 : शुक्र कर्क राशी सोडून आज रात्री सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र 32 दिवस आणि 04 तास येथे राहील, जाणून घ्या कोणत्या राशींवर परिणाम होणार?
Shukra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, आज शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे, जेथे शुक्र पूर्ण 32 दिवस राहणार आहे. यानंतर 3 नोव्हेंबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या संक्रमणाने अनेक राशींचे भाग्य उजळेल.
शुक्र हा सुख, वैभव, समृद्धी आणि सौंदर्याचा कारक
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा सर्व राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव नक्कीच पडतो. वैदिक ज्योतिषात शुक्र हा सुख, वैभव, समृद्धी, विलास आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो. शुक्राला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. आज, 2 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता, शुक्र कर्क राशी सोडून सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र 32 दिवस आणि 04 तास येथे राहील. यानंतर 03 नोव्हेंबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे तीन राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जाणून घ्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत?
कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश
आज, 2 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता, शुक्र कर्क राशी सोडून सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र 32 दिवस आणि 04 तास येथे राहील. यानंतर 03 नोव्हेंबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल.
अनेक राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल
सिंह राशीत असताना शुक्र 17 ऑक्टोबरला पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आणि 30 ऑक्टोबरला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे सिंह राशीत संक्रमण होताच अनेक राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकू लागेल आणि या काळात त्यांना शुभ परिणाम देखील मिळतील. चला जाणून घेऊया या शुभ राशींबद्दल.
सिंह
शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत सूर्यदेवासह शुक्र देवही तुमच्यावर कृपा करतील. या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. अविवाहित लोकांचा विवाह निश्चित केला जाऊ शकतो.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्हाला काही उत्कृष्ट ऑफर देखील मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला वर्तमान आणि भविष्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठीही हे संक्रमण अनुकूल ठरणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या