Vastu Tips : काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
Vastu Tips : पोपट घरात पाळणं शुभ मानलं जातं. तर, काहीजण पोपटाशी संबंधित घरात काही नकारात्मक ऊर्जा तर नाही ना येणार या बाबतीत संकोच मनात ठेवतात.

Vastu Tips : भारतात पोपटाला केवळ एक सुंदर पक्षीच मानत नाहीत. तर, पोपट (Parrot) हा असा पक्षी आहे ज्याला आपण सुख-शांतीचं प्रतीक मानतो. आपल्या आजूबाजूला अनेक लोकांच्या घरात आपण पोपट पाळलेला पाहिलं आहे. पोपट घरात पाळणं शुभ मानलं जातं. तर, काहीजण पोपटाशी संबंधित घरात काही नकारात्मक ऊर्जा तर नाही ना येणार या बाबतीत संकोच मनात ठेवतात. त्यामुळेच घरात पोपट पाळणं शुभ मानलं जातं. याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
पोपट आणि माणसांचं नातं
पोपट हा एकमेव असा पक्षी आहे जो मानवाची भाषा बोलू शकतो. पोपट फक्त तुमचं बोलणंच समजत नाही तर ते बोलण्याचा प्रयत्न देखील करतो. पोपटाच्या आवाजात एक आपलेपणा असतो. पोपटामुळे घरातील वातावरण शांत राहते. जर तुम्ही पोपटावर खरं प्रेम करत असाल तर तो तुमच्या भावना समजून घेतो.
घरात सकारात्मकता येते
वास्तूशास्त्रानुसार, पोपट पाळल्याने घरात सुख-समृद्धी येते. असं म्हणतात की, यामुळे घरातील सदस्य मानसिकरित्या मजबूत होतात. तसेच, नात्यात गोडवा निर्माण होतो. तसेच, घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
नकारात्मक ऊर्जा दूर होते
असं म्हणतात की, घरात पोपट पाळल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. राहू, केतू आणि शनीसारख्या ग्रहांची वाईट दृष्टीपासून संरक्षण होते. याच कारणामुळे अनेक लोक आपल्या घरात, दुकानात किंवा ऑफिसमध्ये पोपट पाळतात किंवा फोटो ठेवतात.
आरोग्य सुधारते
काही लोकांच्या मान्यानुसार, जर एखादी व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त असेल तर त्यांनी घरात पोपट पाळावा. यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम होतो. तसेच, मानसिक तणावापासूनही मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















