Vipreet Rajyog: सूर्याच्या मार्गक्रमणामुळे बनणार विपरीत राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार
Vipreet Rajyog: 2023 वर्ष सरता सरता अनेक राजयोग तयार होत आहेत, 12 डिसेंबरला विपरीत राजयोग तयार होणार आहे. विपरीत राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत.
Vipreet Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सूर्याच्या मार्गक्रमणाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर होतो. याचप्रमाणे सूर्याच्या मार्गक्रमणामुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग देखील तयार होतात. 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करत असल्याने विपरीत राजयोग तयार होत आहे. विपरित राजयोग तयार झाल्याने काही राशीच्या लोकांचं नशीब चमकेल, त्यांच्या जीवनातील समस्या संपुष्टात येतील.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आठव्या घराचा स्वामी सहाव्या किंवा बाराव्या भावात गेल्यावर विपरित राजयोग तयार होतो. सूर्याने धनु राशीत प्रवेश केल्यामुळे तो मकर राशीच्या बाराव्या घरात गेला आहे, यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. विपरीत राजयोग तयार झाल्याने काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. या भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या बाराव्या घरात विपरीत राजयोग तयार होत आहे, अशा स्थितीत या जीवनातील समस्या संपुष्टात येऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. खराब आरोग्यापासून आराम मिळू शकतो, यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना संशोधन अभ्यासासाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे, त्यांनाही यश मिळू शकणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकतं, तुम्ही चांगलं यश संपादन करू शकता.
मेष (Aries)
मेष राशीच्या नवव्या घरात विपरीत राजयोग तयार झाल्याने या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक गोष्टींमध्ये उत्साहाने सहभागी होऊ शकाल. विद्यार्थ्यांनाही लाभ मिळू शकतो. भाऊ-बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे, वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची अनेक शक्यता आहेत. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकणार आहे. करिअरमध्ये तुमची प्रगती होऊ शकते.
तूळ (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. वरिष्ठ अधिकारीही तुमच्या कामात लक्ष देतील. व्यवसायात तुम्हाला काही प्रकल्प मिळू शकतात. राजयोगाच्या प्रभावामुळे ते नवीन वाहन, घर खरेदी करण्याचा विचार करू शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: