New Year 2024 : नववर्षात 'या' राशीच्या लोकांना होणार धनलाभ; प्रगतीचे मार्ग होणार खुले, तिजोरी नेहमी राहील भरलेली
Ruchak Rajyog In Kundali : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नववर्षात मंगळ मकर राशीत भ्रमण करून रुचक राजयोग तयार करणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतील.
Mangal Gochar Effect : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळेवर संक्रमण करतो. येत्या वर्षी म्हणजेच, 2024 मध्ये ग्रहांच्या मार्गक्रमणामुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग तयार होत आहेत, ज्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होईल.
वर्षाच्या सुरुवातीला मंगळ आपल्या उच्च राशी, म्हणजेच मकर राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत रुचक राजयोग तयार होत आहे, याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल, परंतु विशेषतः 3 राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा अधिक प्रभाव दिसून येईल. तुम्हाला धन-संपत्ती मिळेल. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष
मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केल्यावर तयार होणारा रुचक राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे आणि मंगळ या राशीच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहे. या काळात तुमची तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. एवढेच नाही तर, व्यावसायिक जीवनातही प्रगती साधता येईल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. या काळात तुम्हाला आर्थिक स्थितीतून दिलासा मिळेल. बेरोजगारांना यावेळी नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरदारांना बढतीची संधी मिळेल. व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल.
वृषभ
ज्योतिष शास्त्रानुसार, रुचक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. येत्या वर्षात मंगळ तुमच्या राशीच्या नवव्या घरात जाणार आहे, त्यामुळे नशीब तुमच्या बाजूने असेल. यावेळी तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि धन-संपत्ती वाढेल. या काळात तुम्हाला तुमचे वडील आणि गुरू यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात तुम्ही कामाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. परदेशात जाऊन अभ्यास करण्याची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी रुचक राजयोग अनुकूल ठरेल. 2024 मध्ये मंगळ तुमच्या राशीच्या चौथ्या घरात जाणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला सर्व भौतिक सुखं मिळतील. यावेळी तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. मंगळाचे संक्रमण वडिलोपार्जित संपत्तीतून आनंद देईल. मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित व्यवसाय करून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. यावेळी तुमची प्रतिष्ठा आणि संपत्ती वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. आगामी काळात तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुम्हाला चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: