Mandir Vastu Tips : घरात देव्हारा स्थापन करण्याआधी वास्तूचे 'हे' नियम जाणून घ्या; कोणाचीच दृष्ट लागणार नाही
Mandir Vastu Tips : साधारणपणे घरांमध्ये लाकडी मंदिरे ठेवली जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात मंदिराची स्थापना करताना हे वास्तु नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Mandir Vastu Tips : जवळपास प्रत्येक भारतीय घरात (Vastu Tips) देवाचा देव्हारा असतो. असं कोणतंच भारतीय घर नसणार ज्यात देव्हारा (Temple) दिसणार नाही. खरंतर घरात स्थापित केलेला देव्हरा हे एक पवित्र स्थान मानलं जातं. कारण घरातलं हे एक असं ठिकाण आहे जिथून सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात वावरते. जर तुमच्या घरात लाकडी देव्हारा बसवलेला असेल किंवा तुम्ही तो बसविण्याचा विचार करत असाल तर काही वास्तू नियम नक्कीच लक्षात घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला त्यातून शुभ परिणाम मिळतील.
लाकूड कसं असावं?
जर तुम्ही तुमच्या घरात लाकडापासून बनवलेल्या देव्हाऱ्याची स्थापना करत असाल तर नेहमी शीसम लाकूड किंवा सागवान लाकडापासून बनवलेला देव्हारा निवडा. कारण हे लाकूड अत्यंत शुभ मानले जातात. तसेच हे लाकूड चांगले असतात आणि जास्तीत जास्त काळ टिकाणारे असतात. त्यामुळे तुम्ही या लाकडांचा वापर करू शकता.
देव्हारा कोणत्या दिशेला ठेवावा?
देव्हारा ठेवण्यासाठी घराची पूर्व दिशा उत्तम मानली जाते. देव्हारा या दिशेला ठेवून पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे आणि तुमची पाठ पश्चिमेकडे असावी. याशिवाय उत्तर दिशेलाही तुम्ही देव्हाऱ्याचं स्थान ठेवू शकता.
'या' गोष्टी लक्षात ठेवा
देव्हाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरावे. असे केल्याने देवी-देवतांचे आशीर्वाद मिळू शकतात. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. त्यात कुठेही घाण आणि धूळ साचू देऊ नका.
कोणता दिवस चांगला?
देव्हाऱ्याच्या स्थापनेसाठी तुम्ही सुरु असलेला काळही निवडू शकता. असे मानले जाते की, या दिवसांत घरामध्ये देव्हाऱ्याची स्थापना केल्यास खूप शुभ फळ मिळते. यासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात. मंगळवार, शनिवार आणि रविवारी देव्हाऱ्याची स्थापना करणे शुभ मानले जात नाही.
तसेच, घरात देव्हारा स्थापन केल्यानंतर जेव्हा तुम्ही मूर्तीची पूजा कराल तेव्हा स्नान केलेलं असावं. तसेच, काहीही न खाता पूजा करावी. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी चांगला धूप आणि अगरबत्ती लावावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: