Numerology : अत्यंत हळव्या स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; नातं जपण्यात कधीही मागे हटत नाहीत; प्रत्येक पावलावर देतात साथ
Numerology Of Moolank 2 : अंकशास्त्रामध्ये 2 क्रमांक असलेल्या लोकांना खूप खास मानले जाते. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे.
Numerology Of Moolank 2 : अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही मूलांक (Moolank) नक्कीच असतो. हा मूलांक क्रमांक आपल्या जन्मतारखेनुसार ठरवला जातो. असं मानलं जातं की, आपले भाग्य आपल्या मूळ संख्येशी जोडलेलं आहे. मूलांक नंबरवरून व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाचा अंदाजही लावता येतो.
अंकशास्त्रात प्रामुख्याने 1 ते 9 अंक वापरले जातात या अंकांना मूलांक म्हणतात. यामध्ये आज आपण मूलांक 2 विषयी जाणून घेणार आहोत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 2 असते. मूलांक 2 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्त्व कसं असतं, त्यांचा स्वभाव कसा असतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
नातेसंबंध जपण्यात पुढे
अंकशास्त्रामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांना खूप खास मानले आहे. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे, या मूलांकाचे लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. इतरांच्या भावना यांना लगेच कळतात आणि त्यांना समजूनही घेतात. या मूलांकाचे लोक नातेसंबंध जपण्यात पुढे राहतात.
स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात
या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत. उलट धैर्याने आलेल्या परिस्थितीचा सामना करतात. या जन्मतारखेचे लोक इतरांशी समन्वय साधण्यात पटाईत असतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात.
या जन्मतारखेच्या लोकांचं कलेवर प्रचंड प्रेम असतं. त्यामुळेच ते कला, संगीत, लेखन इत्यादी क्षेत्रात यश मिळवतात. हे लोक विश्वासार्ह असतात आणि ते जे वचन देतात ते पूर्ण करतात. हे लोक त्यांच्या मित्र आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करतात.
निर्णयक्षमतेचा अभाव असतो
2 जन्मतारीख असणारे लोक प्रचंड हळव्या मनाचे असतात त्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेण्यात अडचणी येतात. थोडक्यात, या लोकांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असतो. ते एकाच विचारावर ठाम नसतात. यांची वितारसरणी वारंवार बदलत असते यामुळेच त्यांना कोणताही निर्णय सहजासहजी घेता येत नाही. हे लोक खूप भावनिक असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होतात.
मूलांक 2 च्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. हे लोक त्यांच्या क्षमतेवर शंका घेतात आणि स्वतःला कमी लेखतात. त्यांना नेहमी इतरांच्या सल्ल्याची गरज असते. स्वभावाने हे लोक अत्यंत विनम्र असतात आणि चार लोकांसमोर आपलं मत मांडण्यात संकोच करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: