Solar Eclipse 2023 Effects: 20 एप्रिलला सूर्यग्रहण किती वाजता सुरू होईल? कधी संपेल, जाणून घ्या
Solar Eclipse 2023 Effects: विज्ञानामध्ये सूर्यग्रहण ही खगोलीय घटना मानली जात असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अत्यंत अशुभ मानली जाते. ग्रहणाची वेळ आणि परिणाम जाणून घेऊयात.
सूर्यग्रहण 2023 : (Suraya Grahan 2023) 20 एप्रिल रोजी, वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. यावेळचे सूर्यग्रहण देखील महत्त्वाचे मानले जाते कारण यंदा सूर्यग्रहण वैशाख महिन्यातील अमावस्येला येणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. अशा स्थितीत सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. विज्ञानामध्ये सूर्यग्रहण ही खगोलीय घटना मानली जात असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अत्यंत अशुभ मानली जाते. ग्रहणाची वेळ आणि परिणाम जाणून घेऊयात.
कुठे दिसणार सूर्यग्रहण?
20 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंद महासागर, याठिकाणी पाहता येणार आहे. दक्षिण पॅसिफिक समुद्र, आणि न्यूझीलंडमध्ये देखील दिसू शकते. ग्रहणाच्या काळात सूर्याला त्रास होतो, त्यामुळे ज्याचा परिणाम सर्वांना होतो, असं म्हणटल जातं
सूर्यग्रहणाची वेळ काय असेल? (Solar Eclipse 2023 Time)
20 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण सकाळी 07:05 वाजता होणार आहे. हे ग्रहण दुपारी 12.29 वाजता संपेल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटे असणार आहे. हे ग्रहण मेष राशीतील कृष्ण पक्षातील अमावास्येला अश्विनी नक्षत्रात सुरु होईल. यावेळचे सूर्यग्रहण देखील महत्त्वाचे मानले जाते कारण हा दिवस वैशाख महिन्यातील अमावस्या आहे. या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते.
सुतक कालावधी वैध राहणार नाही
सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. ज्योतिषशास्त्रात सुतक काळ अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. मात्र, हा सुतक काळात ग्रहण दिसत असतानाच वैध असतो. 20 एप्रिल रोजी होणारे ग्रहण भारतात दिसणार नाही. म्हणूनच येथे सुतक कालावधीचाही विचार केला जाणार नाही. यावेळी मंदिराचे दरवाजे बंद केले जाणार नसून सर्व धार्मिक कार्य करता येणार आहेत. गर्भवती महिलांनी वेद पाळण्याची गरज नाही असं पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)