(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surya Gochar 2024 : नवीन नोकरी, प्रमोशन, पगारातही चांगली वाढ! सूर्याच्या संक्रमणामुळे पुढचा एक महिना 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य
Surya Gochar 2024 : कर्क राशीत सूर्याचं संक्रमण एक महिन्यापर्यंत बुध आणि शुक्र ग्रहासह युती करणार आहेत.
Surya Gochar 2024 : सूर्याला (Sun) ग्रहांचा राजा म्हटलं जातं. हाच सूर्य ग्रह सध्या मिथुन राशीत विराजमान आहे. 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सूर्य कर्क राशीत 17 ऑगस्टपर्यंत स्थित असणार आहेत. तर, कर्क राशीत सूर्याचं संक्रमण एक महिन्यापर्यंत बुध आणि शुक्र ग्रहासह युती करणार आहेत. सूर्याचं हे राशी परिवर्तन कोणत्या राशींच्या लोकांसाठी शुभ असणार आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
या दरम्यान मेष राशीच्या लोकांची लग्जरी वस्तू खरेदी करण्यामागची उत्सुकता वाढलेली दिसेल. यामुळे तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. लक्ष्मीचा वास सदैव राहील. ऑफिसच्या ठिकाणी बॉसबरोबर तुमचे चांगले संबंध असतील. तसेच, सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा कार्यभार वाढलेला दिसेल. जर तुम्ही टीम वर्क करत असाल तर एकजुटीने काम करणं गरजेचं आहे. व्यापारी वर्गातील लोकांना ग्राहकांकडून चांगला पाठिंबा मिळेल. तसेज, जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात चांगली डील मिळू शकते.या दरम्यानु तुमचे नेटवर्क्स अधिक स्ट्रॉंग होतील. मागच्या वेळी तुमचं रखडलेलं प्रमोशन यावेळी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी योजना ते खेळाच्या संबंधातील सर्व प्रकारच्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमचे प्रॉपर्टीचे वाद वाढू शकतात.तसेच, या काळात तुमच्या भावा-बहिणीची चांगली प्रगती झालेली दिसून येईल. आरोग्य देखील चांगलं राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. महिला बॉस यांचं वर्चस्व जास्त चाललेलं दिसेल. जे लोक सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात त्यांना येत्या काळात चांगलं प्रपोजन मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तब्येतीच्या छोट्या-मोठ्या तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. मित्रांच्या सहयोगाने तुमची अनेक कामे साध्य होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :