Shani Dev : शनीची वक्री चाल सर्वात आधी 'या' 8 राशींची अडचण वाढवणार; सुटका करण्यासाठी आत्ताच करा 'हे' उपाय
Shani Dev : शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो असं अनेकदा म्हटलं जातं. आता वक्री झालेला शनी सर्वात आधी कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे हे जाणून घेऊयात.
Shani Dev : ग्रहांचं मार्गक्रमण आणि वक्री चाल अशा दोन पद्धतींनी गती होते. मार्गक्रमण म्हणजे आपल्या स्वाभावानुसार गतीने चालणे. तर, वक्री चाल म्हणजे उलटी चाल. ग्रहांच्या चालीनुसार, फक्त सूर्य (Sun) आणि चंद्र कधीच वक्री चाल करत नाहीत. तर, इतर सर्व ग्रह वक्री चाल चालतात. काही दिवसांपूर्वीच शनीने (Shani Dev) कुंभ राशीत वक्री चाल केली होती. शनीची (Lord Shani) वक्री चाल जर अशुभ असेल तर व्यक्तीला अशुभ परिणामच मिळतात. पण, काही वेळेला चांगले परिणाम देखील मिळू शकतात.
शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो असं अनेकदा म्हटलं जातं. आता वक्री झालेला शनी सर्वात आधी कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
शनी किती दिवस वक्री अवस्थेत असणार?
सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. 29 जून रोजी शनीने आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री चाल केली होती. आता 15 नोव्हेंबरपर्यंत शनी याच राशीत आणि याच अवस्थेत असणार आहे. शनीची ही चाल फार महत्त्वपूर्ण आहे. यामुळे, साडेसाती, ढैय्या आणि मार्गक्रमणची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. या राशीने जवळपास आठ राशींवर परिणाम होणार आहे.
आता, सध्या पाहिल्यास, शनीची सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसाती सुरु आहे. मात्र, या परिवर्तनानंतर शनीची धनु राशीवर साडेसाती सुरु होणार आहे. तर, कर्क आणि वृश्चिक राशीवर सध्या ढैय्या सुरु आहे. त्यामुळे मिथुन आणि तूळ राशीवर पुन्हा ढैय्यासारखी स्थिती होणार आहे. यामुळे एकूण आठ राशींवर याचा परिणाम होणार आहे.
शनीची साडेसाती सुरु असल्यास काय करावं?
जर, तुम्हाला शनीच्या साडेसातीचा प्रभाव दूर करायचा असेल तर, रोज सकाळी आणि सायंकाळी 108 वेळा शनीच्या मंत्राचा जप करा. तसेच, प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तसेच,शनिवारच्या दिवशीच गरजूंना भोजन दान करा. खरंतर, शनीला कर्मफळदाता म्हटलं जातं. त्यामुळे जर तुम्ही वाईट कर्म केले असतील तरच तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास होणार आहे त्यामुळे प्रत्येकानी शनीच्या वक्री चालीचा परिणाम अशुभच होईल असे मानू नये. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला चांगलेच फळ मिळतील.
शनीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय
- नेहमी स्वत:शी आणि इतरांशी प्रामाणिक राहा.
- नेहमी सत्याचा मार्ग स्विकारा.
- ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करा.
- तुळशीच्या झाडावर आणि पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करा.
- शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून तो चौथऱ्यावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली लावा.
- सूर्योदयाच्या आधी उठून देवाची उपासना करा.
- तसेच, "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :