Shukra Gochar 2025 : वृश्चिक राशीत लवकरच शुक्राचं संक्रमण; 26 नोव्हेंबरपासून 'या' राशींच्या हातात खेळणार पैसा, चौफेर होणार धनलाभ
Shukra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्राच्या राशीत संक्रमण करताना विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. शुक्र 20 डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीत असणार आहे.

Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वृश्चिक राशीत शुक्र ग्रहाचं (Shukra Gochar) संक्रमण 26 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवारी होणार आहे. या कालावधीत सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. शुक्र ग्रहाचं वृश्चिक राशीत होणारं संक्रमण उत्साह, तीव्रता आणि परिवर्तनाचा हा काळ असणार आहे. मंगळ आणि केतूद्वारा शासित वृश्चिक राशी आपल्या रहस्यमयी आणि शक्तिशाली ऊर्जेचं प्रेम, सौंदर्याचं प्रतीक मानतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्राच्या राशीत संक्रमण करताना विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. शुक्र 20 डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीत असणार आहे. शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने 4 राशींना लॉटरी लागणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांसाठी आठव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. या कालावधीत तुमचे नवीन मित्र बनतील. भौतिक सुख सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
तूळ रास (Libra Horoscope)
या राशीच्या दुसऱ्या चरणात शुक्राचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी चांगला असेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शुक्र ग्रह या राशीच्या पहिल्या चरणात संक्रमण करणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद दिसून येईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, तुमच्या प्रेम जीवनात गोडवा राहील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
शुक्र ग्रहाचं हे संक्रमण धनु राशीच्या बाराव्या चरणात असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी दिसून येईल. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, परदेशात यात्रेला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा टिकून राहील. वैवाहिक जीवनात जे अडथळे येतील ते हळुहळू दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















