Shukra Gochar 2024 : 22 डिसेंबरला शुक्राची चाल बदलणार; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नोकरीत प्रमोशनचे योग
Shukra Nakshatra Parivartan 2024 : राक्षसांचा स्वामी शुक्र 22 डिसेंबरला रात्री 10.25 वाजता धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल, यामुळे 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू होईल.
Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांप्रमाणे धनदाता शुक्र (Venus) देखील ठराविक काळानंतर राशी बदलतो. शुक्र राशीप्रमाणे नक्षत्र देखील बदलत राहतो, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो.
वैदिक पंचांगानुसार, शुक्र 22 डिसेंबर रोजी रात्री 10.25 वाजता धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि 4 जानेवारीपर्यंत तो या नक्षत्रात राहील. जेव्हा शुक्र धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा काही राशींचं भाग्य उजळू शकतं, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
सिंह रास (Leo)
धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणारा शुक्र हा सिंह राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. या काळात या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळू शकतात. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडतील. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. यासोबतच, जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात असं करणं फायदेशीर ठरू शकतं. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही केलेल्या योजनांद्वारे तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र आरोग्याबाबत थोडं सावध राहण्याची गरज आहे. सट्टेबाजीशी संबंधित व्यवसायात तुम्हाला नफा मिळू शकतो.
कन्या रास (Virgo)
शुक्राचं धनिष्ठ नक्षत्रात भ्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतं. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पैसा व्यवस्थापन क्षमता देखील वाढेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. प्रेम जीवनात आनंद येऊ शकतो.
मकर रास (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरू शकतो. त्यांच्या आयुष्यात आनंदच येऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या क्षमतेच्या मदतीने भरपूर नफा कमवू शकता. तुमचं लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक राहाल. आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: