Astrology : 18 सप्टेंबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; होणार अनपेक्षित धनलाभ, संपत्तीत होणार अफाट वाढ
Shukra Gochar 2024 : ग्रहांच्या हालचालीचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम पडतो. नुकताच 25 ऑगस्टला शुक्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे आणि 18 सप्टेंबरपर्यंत शुक्र याच राशीत राहील, ज्याच्या परिणामामुळे काही राशी मालामाल होतील.
Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची हालचाल खूप महत्त्वाची मानली जाते. ग्रहांच्या हालचालीचा शुभ आणि अशुभ परिणाम सर्व राशींवर पडतो. 25 ऑगस्ट रोजी शुक्र (Venus) ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. पुढे 18 सप्टेंबरपर्यंत शुक्र या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक आनंद, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, वासना आणि प्रणय यासाठी जबाबदार ग्रह आहे.
ज्योतिषीय गणनेनुसार, शुक्र कन्या राशीत असल्यामुळे काही राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. नेमक्या कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) शुक्राची चाल लाभदायी ठरेल? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असेल. या महिनाभराच्या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. खर्चात कपात होईल. व्यवहारासाठी काळ अतिशय शुभ राहील. गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्हाला एखादं नवीन काम सुरू करता येईल. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही. 2025 मध्ये मेष राशीसाठी अडचणी वाढतील, तेव्हा मात्र शनीची साडेसाती सुरू होईल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा घर खरेदी करू शकता. व्यवहारासाठी वेळ शुभ आहे. आर्थिक स्थिती चांगली होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने सर्व वाईट गोष्टी दूर होतील.
सिंह रास (Leo)
आर्थिकदृष्ट्या हा काळ अतिशय शुभ असणार आहे. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. व्यवसायासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. या काळात तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. तुम्ही काही नवीन काम देखील सुरू करू शकता.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू या काळात मजबूत असेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे घराला धन-ऐश्वर्य लाभेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ वरदानासारखा असेल, व्यवसायातून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा :