Budh Gochar 2024 : ग्रहांचा राज बुध आणि शुक्राचा उदय; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, पावलोपावली मिळणार यशाची साथ
Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र या दोन ग्रहांचा जूनच्या शेवटी उदय होईल, ज्यामुळे काही राशींचा सुवर्ण काळ सुरू होईल आणि या राशींच्या धन-संपत्तीत वाढ होईल.
Shukra And Budh Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा ठराविक वेळेनंतर उदय होतो आणि अस्त होतो, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशासह जगावर दिसून येतो. आता यातच 28 जूनला बुध (Mercury)आणि शुक्राचा (Venus) मिथुन राशीत उदय झाला आहे. अशा स्थितीत, या दोन ग्रहांच्या उदयाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण मुख्यत: 3 राशींचं नशीब या काळात उजळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
बुध आणि शुक्राचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण या दोन्ही ग्रहांचा उदय तुमच्या राशीच्या चढत्या घरावर होणार आहे . त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, तुमचे शब्द पूर्वीपेक्षा अधिक गोड आणि प्रभावी होतील. बुध आणि शुक्राचा उदय व्यापार करणाऱ्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देणारा ठरेल, व्यावसायिक नफ्यात राहतील. यावेळी विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच, जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. अविवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात नवीन जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात फायदा होईल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राचा उदय शुभ ठरू शकतो. कारण हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीतून धन आणि वाणीच्या घरावर उगवणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. तसेच, तुम्ही कोणतंही नवीन काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. या काळात व्यावसायिकांना उधार घेतलेले पैसे परत मिळतील. हा कालावधी नवीन जबाबदाऱ्या घेण्यासाठी योग्य राहील. नोकरदारांना या काळात प्रमोशन मिळू शकतं, जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ शुभ ठरेल.
सिंह रास (Leo)
बुध आणि शुक्राचा उदय तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण या दोन्ही ग्रहांचा उदय तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरावर होईल, त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कामात किंवा वैयक्तिक जीवनात अद्भुत यश मिळेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात तुम्हाला शेअर बाजार, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :