
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahu Gochar 2024 : मायावी ग्रह राहूने चाल बदलली; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, जे काम हाती घ्याल त्यात मिळणार यश
Rahu Nakshtra Gochar 2024 : राहू ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. त्यानुसार नुकताच राहूने शनीच्या नक्षत्रात प्रवेश केला आहे, ज्याचा विशेष लाभ 3 राशींना होणार आहे.

Rahu Gochar 2024 : राहू हा मायावी ग्रह आहे. राहूच्या (Rahu Transit 2024) चालीत बदल झाला की त्याचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतोच. राहू सुमारे 18 महिन्यांनी आपली राशी बदलतो. सध्या तो मीन राशीत आहे आणि 2025 पर्यंत या राशीतच राहील. पण राहूच्या नक्षत्रात वेळोवेळी बदल होतो. 16 ऑगस्टला राहूने शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे, 2 डिसेंबरपर्यंत राहू याच नक्षत्रात राहील. या काळात काही राशींचं नशीब पालटू शकतं, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
राहूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. राहूच्या नक्षत्रात होणारा बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. ज्या कामाचा तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत होता ते काम आता पूर्ण होऊ शकतं. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर नफाही मिळेल. फायनान्स आणि शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. शनि आणि राहूचा हा संयोग तुमच्या जीवनात आनंद आणू शकतो.
कन्या रास (Virgo)
उत्तराभाद्रपदाच्या नक्षत्रात राहूच्या आगमनामुळे कन्या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. राहूच्या नक्षत्रातील बदलाचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे बघायला मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ आता दिसणार आहे, त्यामुळे तुमचं विदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायातही फायदा होण्याची दाट शक्यता आहे. मानसिक आणि शारीरिक तणावातून तुम्हाला आराम मिळेल.
तूळ रास (Libra)
राहूच्या नक्षत्र बदलाचे चांगले परिणाम तूळ राशीच्या लोकांना दिसतील. या राशीच्या लोकांचं जीवन आनंदाने बहरेल. अचानक आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होतील. भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. परदेशातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. समाजात मान-सन्मान मिळेल. शत्रूंचा नाश होईल. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवाल. नोकरीतही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्हाला अनेक मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
