Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
Shravan 2026 : धर्म ग्रंथांमध्ये शिवलिंगाला अर्पण करण्यास अयोग्य मानल्या जाणाऱ्या काही वस्तूंचाही उल्लेख आहे. असे मानले जाते की, पूजेच्या नियमांचे पालन केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात.

Shravan 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, श्रावण महिना भगवान शंकराच्या (Lord Shiva) पूजेसाठी सर्वात पवित्र मानला जातो. या संपूर्ण महिन्यात, भक्त शिवलिंगाला जल, दूध, बेलपत्र आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण करून महादेवाचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात. तथापि, धर्म ग्रंथांमध्ये शिवलिंगाला अर्पण करण्यास अयोग्य मानल्या जाणाऱ्या काही वस्तूंचाही उल्लेख आहे. असे मानले जाते की, पूजेच्या नियमांचे पालन केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात, तर निषिद्ध वस्तू अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया की, श्रावण महिन्यात शिवलिंगाला काय अर्पण करावे आणि काय टाळावे.
श्रावणा महिन्यात शिवलिंगावर काय वाहू नये?
तुळशीचे पान
भगवान विष्णू यांना प्रिय असलेली तुळस ही शिवलिंगावर अर्पित केली जात नाही. पौराणिक मान्यतेनुसार तुळस आणि भगवान शंकराच्या निगडीत कथेच्या मते शंकरांना तुळस वाहत नाही.
हळद
भगवान शंकराच्या पूजेत हळद वापरली जात नाही. कारण ते सौभाग्य आणि शुभ कार्याचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंग भगवान शंकराच्या निराकार स्वरुपाचे प्रतीक आहे. म्हणून शिवलिंगावर हळद अर्पित केली जात नाही.
केतकी
शिव पुराणाच्या मते भगवान शंकरांनी केतकीच्या फुलाला पूजेत न वापरायचे वरदान दिले होते. म्हणून केतकीचे फुल भगवान शंकराना अर्पण केले जात नाही.
शंखाचे पाणी
शिवलिंगावर शंखाचे पाणी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते. शिवपुराणानुसार, भगवान शंकराने शंखचुड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून, शंखाचे पाणी अर्पण करण्यास आणि तांब्याच्या किंवा पितळ्यांचे भांडे वापरावे.
नारळाचे पाणी
पूजेत नारळ अर्पित केले जाते, पण त्याचे पाणी शिवलिंगावर अर्पित केले जात नाही. त्याऐवजी त्या नारळाचा प्रसाद वाटल्यास अधिक शुभ मानले जाते.
शिवलिंगावर काय अर्पित केले जाते?
श्रावण महिन्यात भगवान शंकराना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर शुद्ध जल, गंगाजल, कच्च दूध, दही, मध, तूप आणि साखर याने पंचामृत बनवून अभिषेक केले जाते. याच्या व्यतिरिक्त बेलपत्र, बेलाचे फळ, धोत्र्याचे फूल आणि भस्म अर्पित करणे शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा जप केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Navpancham Rajyog 2026 : सूर्य-शनिचा मिळून बनणार नवपंचम राजयोग; 'या' 4 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जबरदस्त धनलाभाचे संकेत



















