(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीला आवर्जून करा 'या' गोष्टींचं दान, सर्व अडचणी होतील दूर, पैशांनी भरून जाईल घर
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीचे 9 दिवस घरात देवीचा वास असतो, या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी काही चांगली कर्मं केली पाहिजे. या काळात दानाला विशेष महत्त्व आहे, वस्तूंच्या दानामुळे घरात समृद्धी नांदते आणि पैशाला पैसा टिकून राहतो.
Shardiya Navratri 2024 : यंदा नवरात्री उत्सव 3 ऑक्टोबरला सुरू होणार असून 12 ऑक्टोबर 2024 ला संपणार आहे. नवरात्री (Navratri 2024) उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव असल्यामुळे विशेषत: या काळात महिलांचा अपमान करू नये, त्यांना दुय्यम वागणूक देऊ नये. तुमच्या आयुष्यात पैशांची टंचाई असेल, तसेच करिअरमध्ये प्रगती होत नसेल, तर यंदा नवरात्रीला हे उपाय आवर्जून करा, या उपायांमुळे तुमच्या आयुष्याची भरभराट होईल.
पुस्तकांचे दान
नवरात्री हा स्त्रीच्या शक्तीचा उत्सव असल्यामुळे स्त्री सक्षम होण्यासाठी तुम्ही पुस्तकांचे दान करा. यामुळे तुम्हाला खूप पुण्य लाभले.
अन्नदान
ज्योतिषशास्त्रानुसार, अविवाहित मुलींनी अन्नदान केल्यास देवी त्यांच्यावर प्रसन्न होते. तसेच त्यांना चांगला जोडीदार भेटतो आणि करिअरमध्येही त्यांची प्रगती होते.
फळांचे दान
नवरात्रीत अनेक जण उपवास करतात आणि फळांचा आहार घेतात. त्यामुळे नवरात्रीत फळांचे दान हे सर्वश्रेष्ठ असते.
केळी
फळे दान केल्यास जीवनात सुखशांती लाभते. तसेच रखडलेली कामे पूर्ण होतात. विशेषता केळीचे दान करावे.
वेलचीचे दान
तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसात वेलचीचे दान करा. यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतील आणि पैशांची भरभराट होईल.
शारदीय नवरात्री 2024 कधी आहे? (Shardiya Navratri 2024 Date)
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल. यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी सुरु होईल. तर 4 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल.
घटस्थापना मुहूर्त (Ghatasthapana Muhurta)
नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.
घटस्थापना पूजा पद्धत (Ghatasthapana Puja Vidhi)
शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा, त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा.
मंदिर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुद्ध करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या, त्यानंतर त्यात धान्य घाला.
याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे.
कलशावर धागा बांधा. त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा.
तसेच कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवा. नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा. विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा.
दुर्गा सप्तशती पाठ करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: