एक्स्प्लोर

Shardiya Navratri 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? शारदीय नवरात्री कधीपासून? जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजा विधी

Shardiya Navratri 2024 Date : गणेशोत्सव संपताच आता लगेच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. यंदा नवरात्री 10 दिवस असणार आहे. यंदा घटस्थापना मुहूर्त काय? दसरा कधी? जाणून घेऊया.

Shardiya Navratri 2024 Date : गणेशोत्सव संपला की वेध लागतात नवरात्रीचे. नवरात्रौत्सव हा भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रौत्सव हा 9 दिवसांचा असतो, परंतु यंदा नवरात्रौत्सव 10 दिवसांचा आहे.

दसऱ्याच्या दिवशी नवरात्रौत्स समाप्त होतो. मराठी वर्षात एकूण 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात. चैत्र महिन्यात 2 नवरात्री असतात. गुप्त नवरात्र देखील असते, यानंतर अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2024) म्हणतात. ही मुख्य नवरात्र असते.  नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा नवरात्री कधीपासून सुरु होतेय? घटस्थापना मुहूर्त आणि पूजा विधी काय? जाणून घेऊया.

शारदीय नवरात्री 2024 कधी आहे? (Shardiya Navratri 2024 Date)

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल. यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी सुरु होईल. तर 4 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल.

घटस्थापना मुहूर्त (Ghatasthapana Muhurta)

नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.

घटस्थापना पूजा पद्धत (Ghatasthapana Puja Vidhi)

शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा, त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा.
मंदिर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून शुद्ध करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या, त्यानंतर त्यात धान्य घाला.
याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे.
कलशावर धागा बांधा. त्यावर कुंकवाने स्वस्तिक बनवा.
तसेच कलशात अक्षता, सुपारी आणि नाणे ठेवा. नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा. विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा.
दुर्गा सप्तशती पाठ करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटा.

शारदीय नवरात्री 2024 तिथी (Navratri 2024 Dates)

दिवस पहिला - 3 ऑक्टोबर, गुरुवार - घटस्थापना, शैलपुत्री पूजा
दिवस दुसरा - 4 ऑक्टोबर, शुक्रवार - ब्रह्मचारिणी पूजा
दिवस तिसरा - 5 ऑक्टोबर, शनिवार - चंद्रघंटा पूजा
दिवस चौथा - 6 ऑक्टोबर, रविवार - विनायक चतुर्थी
दिवस पाचवा - 7 ऑक्टोबर सोमवार - कुष्मांडा पूजा
दिवस सहावा - 8 ऑक्टोबर मंगळवार- स्कंदमाता पूजा
दिवस सातवा - 9 ऑक्टोबर बुधवार- कात्यायनी पूजा
दिवस आठवा - 10 ऑक्टोबर, गुरुवार - कालरात्री पूजा
दिवस नववा - 11 ऑक्टोबर, शुक्रवार - दुर्गा अष्टमी, महागौरी पूजा शारदीय
दिवस दहावा - 12 ऑक्टोबर, शनिवार - नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Guru Vakri 2024 : अवघ्या 16 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर, पाण्यासारखा पैसा जाणार वाया

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
Embed widget