एक्स्प्लोर
Advertisement
Shaniwar Upay : शनिवारी कुणालाच न सांगता गुपचुप करा 'ही' कामं; सर्व अडचणी होतील दूर, शनीची राहील कृपा
Shaniwar Upay : शनिवार हा कर्मदाता आणि न्यायाची देवता शनि महाराजांचा दिवस आहे. शनिवारी हे उपाय केल्याने तुमच्या जीवनाचील दु:खं दूर होतील. पण हे उपाय कोणालाही न सांगता गुपचुप करावे.
Saturday Remedies : जर शनिदेव (Shani Dev) चांगल्या कर्मांचं चांगलं फळ देत असतील तर ते वाईट कर्मांची शिक्षा देण्यास देखील मागेपुढे पाहत नाही. शनि क्रोधित झाला तर जीवनात वाईट घटना घडू लागतात, व्यक्तीला समस्यांनी घेरलं जातं.
तुमच्यासोबतही अशा काही घटना घडत असतील किंवा तुमचं काही नुकसान होत असेल, तर तुमच्यामागे शनीची साडेसाती असल्याचे संकेत मिळतात. शनि नाराज असल्यावर अघटित घटना घडतात. अशा वेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करू शकतात. शनीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शनिवारी कोणालाही न सांगता काही उपाय केले पाहिजे.
शनिवारी करा हे उपाय (Saturday Remedies)
- शनिवारी शनि यंत्राची पूजा केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. शनिदेवाच्या वाईट प्रभावांना शांत करण्यासाठी शनिवारी शनि यंत्राची पूजा करा, मांसाहार सोडून द्या आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या दिवशी काळ्या गाईला उडीद डाळ किंवा तीळ खाऊ घाला.
- शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ‘ओम शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा . यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याला नमस्कार करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी. या उपायानेही शनि महाराज लवकर प्रसन्न होतात.
- कर्जाचे ओझे वाढले असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी शनिवारी काळ्या गाईला बुंदीचे लाडू खाऊ घाला आणि कपाळावर कुमकुम तिलक लावून गायीची पूजा करा. त्यामुळे कर्जमुक्ती मिळेल.
- शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहा आणि नंतर हे तेल दान करा.
- शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचे नऊ दिवे लावा आणि पिंपळाच्या झाडाभोवती फिरवा. यानंतर शनिदेवाची प्रार्थना करा. हा उपाय केल्यास चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
- तीळ, काळे उडीद, तेल, गूळ, काळे कपडे किंवा इस्त्रीचे शनिवारी कोणालाही न सांगता दान करा. शास्त्रात सांगितले आहे की, निस्वार्थपणे आणि गुप्तपणे केलेल्या दानाचे फळ माणसाला मिळतेच.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement