Shani Shash Yog : कुंडलीतील शश राजयोगामुळे 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य! मानसिक शांतीबरोबरच सर्व मार्गाने वाढेल पैशांचा ओघ
Shani Shash Yog : शनि सध्या आपल्या मूळ कुंभ राशीत आहेत. यामुळेच शश नावाचा राजयोगही तयार झाला आहे.
Shani Shash Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला (Shani Dev) फार महत्त्व आहे. शनिला न्यायदेवता (Lord Shani) आणि कर्मफळदाता मानले आहे. ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांच्या तुलनेने शनिची चाल सर्वात संथ गतीने आहे. शनिने जर एखाद्या राशीत प्रवेश केला तर पुढचे अडीच वर्ष तो त्याच राशीत असतो. त्यामुळेच शनिच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होतो. शनिच्या राशी परिवर्तनाने काही राशींवर साडेसाती देखील लागते. तर, काही राशींची साडेसाती संपते.
शनिच्या बाबतीत सांगायचं तर, एका राशीतून परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी शनिला तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनि सध्या आपल्या मूळ कुंभ राशीत आहेत. यामुळेच शश नावाचा राजयोगही तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर आणि कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीत असतो आणि कुंडलीच्या मध्यभागी असतो तेव्हा शश राजयोग तयार होतो. शनी कुंभ राशीत असल्यामुळे आणि षष्ठ राजयोग तयार होत असल्याने काही राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांच्या चढत्या घरात शश राजयोग तयार होतो. त्यामुळे जोपर्यंत शनी कुंभ राशीत राहील तोपर्यंत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक क्षेत्रात चांगली संपत्ती असू शकते. तणावातून आराम मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कोर्ट केसेसमध्ये तुमचा विजय होईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळेल.
मकर रास
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सध्या मकर राशीत शनीची साडेसातीची शेवटची अवस्था सुरू आहे. शनि कुंभ राशीत असल्याने आणि शश राजयोग तयार होत असल्याने अनेक काळापासून तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या भौतिक सुखसोयी वाढतील. पूर्वीच्या तुलनेत तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. समस्यांपासून आराम मिळेल.
वृश्चिक रास
राशीच्या राजयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव दिसून येईल. तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील. अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: