Shani Sade Sati : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी होणार शनी साडेसातीपासून सुटका; फक्त करा 'हा' उपाय - ज्योतिषशास्त्र
Shani Sade Sati : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची साडेसाती कोणत्या राशीच्या लोकांसाठी प्रभावी होणार हे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील शनीच्या स्थितीवरुन माहिती करता येते.

Shani Sade Sati : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सध्यस्थितीत न्यायदेवता, कर्मफळदाता शनी देव (Shani Dev) सध्या मीन राशीत संक्रमण करतायत. यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरु आहे. मात्र, या तीन राशींची साडेसाती नेमकी कधी संपणार या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची साडेसाती कोणत्या राशीच्या लोकांसाठी प्रभावी होणार हे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील शनीच्या स्थितीवरुन माहिती करता येते. मात्र, जर व्यक्तीचे कर्म चांगले असतील तर शनीच्या दशेचा त्या राशीच्या लोकांवर फारसा परिणाम होत नाही. तर, वाईट कर्म करणाऱ्या लोकांना शनीची साडेसाती कधीच सुटत नाही. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होणार आहे. या ठिकाणी कोणत्या राशींना कधी मुक्ती मिळेल हे जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना इतक्यात शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळणार नाही. या राशीच्या लोकांना 31 मे 2032 रोजी मुक्ती मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा सध्या शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सध्या संपत आली आहे. या राशीच्या लोकांना 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा सर्वात जास्त प्रभाव पाहायला मिळणार आहे. या राशीच्या लोकांना 17 एप्रिल 2030 रोजी शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.
शनीच्या साडेसातीपासून सुटका मिळण्यासाठी उपाय
शनीच्या साडेसातीच्या वेळी जितकं होत असेल तितकी गरजूंची मदत करावी. तसेच, काळ्या श्वानाला खाऊ घालावे. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाणे आणि पूर्ण श्रद्धेने शनीदेवाची पूजा करावी तसेच, पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. तसेच, मोहरीचं तेल अर्पण करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















