Shani Rahu Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर शनी-राहू बनवणार महाविनाशकारी 'पिशाच योग'; 'या' 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर
Shani Rahu Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 च्या मार्च महिन्यात शनी ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी राहू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे मीन राशीत राहू आणि शनीची युती होणार आहे.

Shani Rahu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार,कर्मफळदाता शनीला (Shani Dev) नवग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. कारण शनी (Lord Shani) प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. शनी एका राशीत अडीच वर्षांपर्यंत स्थित असतो. तर शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 च्या मार्च महिन्यात शनी ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी आधीपासूनच राहू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे मीन राशीत राहू आणि शनीची युती होणार आहे. यामुळे महाविनाशकारी योग निर्माण होणार आहे. या योगाला फार वाईट योग मानलं जातं. त्यामुळे या काळात काही राशींच्या लोकांना सावधान राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
द्रिक पंचांगानुसार, शनी ग्रह 29 मार्च 2025 रोजी रात्री 22.07 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी राहू ग्रह विराजमान आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लग्न भावात राहू आमि शनी ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे या राशींच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, या काळात तुमच्या आरोग्यावर देखील याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. बिझनेसच्या बाबतीत सतर्क राहा. कोणतीही मोठी डील हातात घेऊ नका. तसेच, कोणाशीही विनाकारण वादविवाद घालण्याचा प्रयत्न करु नका,
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या तिसऱ्या चरणात पिशाच योग बनणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना थोडं सावध राहण्याची गरज आहे. या काळात भावा-बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच, तुम्हाला मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागेल. तुमच्या कुटुंबात अनेक वादविवाद निर्माण होतील. तसेच, आरोग्याची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
राहू आणि शनीच्या युतीने जुळून येणारा पिशाच योग या राशीच्या सप्तम चरणात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना थोडं सावध राहण्याची गरज आहे. तसेच, या काळात चुकूनही कोणतीही गुंतवणूक करु नका. तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. तसेच, वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर अनेक वाद निर्माण होतील. या काळात पार्टनरशिपमधून केलेल्या व्यवसायात देखील नुकसान होऊ शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला मीन राशीत 5 ग्रहांचा होणार 'महादुर्लभ संयोग'; 'या' राशींच्या घरात होणार धन-संपत्तीचा वर्षाव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

