(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Pradosh Vrat 2024 : शनी प्रदोष व्रताच्या दिवशी करा 'हे' उपाय; भगवान शंकराच्या आशीर्वादाने सर्व संकटांपासून मिळेल मुक्ती
Shani Pradosh Vrat 2024 : शनी प्रदोष व्रतामध्ये शनीची साडेसाती आणि ढैय्याच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळविण्यासाठी हा दिवस फार खास मानला जातो.
Shani Pradosh Vrat 2024 : श्रावण महिना अनेक अर्थांनी खास मानला जातो. कारण या महिन्यात अनेक सण-उत्सव समारंभ साजरे केले जातात. याच श्रावण (Shravan) महिन्यातील शेवटचे शनी प्रदोष व्रत (Shani Pradosh Vrat) हे 31 ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे. याच दिवशी शनिवार देखील आला असल्यामुळे या दिवसाला शनी प्रदोष व्रत म्हटलं गेलं आहे.
शनी प्रदोष व्रतामध्ये शनीची साडेसाती आणि ढैय्याच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळविण्यासाठी हा दिवस फार खास मानला जातो. या दिवशी शनीची विशेष पद्धतीने पूजा केल्याने शनीच्या ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळते असं म्हणतात. त्याचबरोबर पितृ तर्पण केल्याने पितृंच्या आत्म्याला शांती मिळते असं देखील म्हणतात.
'या' दिवशी आहे शनी प्रदोष व्रत
हिंदू पंचांगानुसार, कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथीचु सुरुवात 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी होणार आहे. तर, या पूजेचं समापन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सकाळी 4 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे. उदयतिथी आणि प्रदोष काळ हा 31 सप्टेंबर रोजी असल्यामुळे त्रयोदशीचं व्रत हे 31 सप्टेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे.
'या' दिवशी जुळून येणार अनेक शुभ योग
शनी प्रदोष व्रताच्या दिवशी अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. या दिवशी परिधी योग, वरियान योगसह पुष्य नक्षत्र योग सुद्धा जुळून येणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. अशा वेळी भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात.
ढैय्याचा प्रभाव कमी करण्यासाठी 'हे' उपाय करा
शनीच्या दुष्प्रभावांपासून वाचण्यासाठी शनी प्रदोष व्रत हा फार उत्तर मानला जातो. ज्या राशींवर शनीची साडेसाती आणि ढैय्या चा प्रभाव आहे अशा राशींसाठी हे व्रत फार लाभदायक आहे. तुम्ही या दिवशी प्रदोष काळात दुधात काळे तीळ घालून भगवान विष्णूला अर्पण करू शकता. तसेच, कोणत्याही शिव मंदिरात जाऊन तीळाच्या तेलाचा दिवा लावा. तसेच, शनी देवाच्या मंत्राचा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Pradosh Vrat : श्रावण महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी