Shani Pradosh Vrat : श्रावण महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Shani Pradosh Vrat : श्रावण महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत 31 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी ठेवण्यात येणार आहे.
![Shani Pradosh Vrat : श्रावण महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी Shani Pradosh Vrat 2024 know date and puja vidhi shubh muhurta of the day marathi news Shani Pradosh Vrat : श्रावण महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/28/b29bcd68372cb2b3668918df74f568d41724837828075358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Pradosh Vrat : प्रदोष व्रताला हिंदू धर्मात फार महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार, श्रावण (Shravan) महिन्यातील शेवटचे शनी प्रदोष व्रत हे त्रयोदशी तिथीच्या दिवशी असणार आहे. या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती जुळून येणार आहे. शनी प्रदोष (Shani Pradosh) व्रताच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. या दिवशी प्रदोष काळात पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार श्रावण महिन्यातील शेवटचे शनी प्रदोष व्रत नेमकं कधी ते जाणून घेऊयात.
कधी आहे शनी प्रदोष व्रत?
श्रावण महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत 31 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी त्रयोदशी तिथीचा आनंभ 30 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजून 26 मिनिटांनी होणार आहे. तर, 31 ऑगस्ट रोजी रात्री 3 वाजून 41 मिनिटांपर्यंत त्रयोदशी तिथी असेल. तसेच, उदय काळात त्रयोदशी तिथी 31 ऑगस्ट रोजी झाल्यानंतर शनी प्रदोष व्रत या दिवशी ठेवलं जाणार आहे.
शनी प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त (Shani Pradosh Vrat Shubh Muhurta 2024)
शनी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून ते 7 वाजून 44 मिनिटांपर्यंत पूजेसाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे. या दरम्यान प्रदोष व्रताची पूजा केल्याने सर्वात चांगला लाभ मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology : सप्टेंबरमध्ये 3 मोठ्या ग्रहांच्या चाली बदलणार; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा काळ होणार सुरू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)