Shani Jayanti 2024 : यंदाच्या शनी जयंतीला तुमच्या राशीनुसार 'या' गोष्टी दान करा; शनीपिडा झटक्यात होईल दूर
Shani Jayanti 2024 : धार्मिक मान्यतेनुसार, शनीची पूजा केल्याने व्यक्तीला शनी दोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर वेतनात आणि सुख-समृद्धीतही वाढ होते.

Shani Jayanti 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या 6 जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे. शनी जयंती (Shani Jayanti) ही दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साजरी करण्यात येते. या दिवशी न्यायाची देवता असणाऱ्या शनीची पूजा केली जाते. तसेच, आयुष्यातील दु:ख, संकटं दूर करण्यासाठी या दिवशी अनेक उपवास देखील केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, शनीची पूजा केल्याने व्यक्तीला शनी दोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर वेतनात आणि सुख-समृद्धीतही वाढ होते. त्यामुळे यंदाच्या शनी जयंतीला तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणत्या वस्तूंचं दान करावं ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी लाल रंगाचं सिझनल फळ किंवा वस्त्र दान करावे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांनी शनीची कृप मिळविण्यासाठी तांदूळ, साखर आणि दूध दान करावं.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीला प्रसन्न करण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी निळ्या रंगाचे वस्त्र दान करावे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी तांदूळ आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आर्थिक स्थितीनुसार लाल रंगाचं वस्त्र दान करावं.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी गाईच्या गोठ्यात चारा दान करावा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी लस्सीचे वाटप करावे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी रितसर पूजा करावी आणि त्यानंतर येणाऱ्या भक्तांना उसाचा रस द्यावा.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी शनीला प्रसन्न करण्यासाठी भक्तांना मोराचे पिसे दान करावे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी शनीला प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात डमरू दान करावे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांनी शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी चामड्याची चप्पल, उडीद डाळ आणि छत्री दान करावी.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांनी शनीची कृपा मिळविण्यासाठी पिकलेली केळी, बेसनाचे लाडू आणि बेसन इत्यादींचे दान करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Budhwa Mangal 2024 : आज 'मोठा मंगळ'सह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर असणार हनुमानाची विशेष कृपा, मागाल ती इच्छा होईल पूर्ण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
