Shani Gochar : कर्मफळदाता शनीचा मीन राशीत प्रवेश; 2025 मध्ये 'या' 3 राशींना लागणार लॉटरी, धनलाभाचे अनेक शुभ योग
Shani Gochar : द्रिक पंचांगानुसार, शनी 29 मार्च 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत 3 जून 2027 पर्यंत असणार आहे.
Shani Gochar : कर्मफळदाता शनी हा नवग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक आहे. शनीला (Lord Shani) न्यायदेवता असं देखील म्हणतात. शनी (Shani Dev) प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार शिक्षा देतो. यामुळेच शनीला सर्वात क्रूर ग्रह मानतात. तसेच, शनी हा सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यास जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
शनी दीर्घ काळापासून कुंभ राशीत विराजमान आहे आणि मार्च 2025 पर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. त्यानंतर राशी परिवर्तन करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या मीन राशीत आल्याने नवीन वर्ष 2025 मध्ये काही राशींच्या लोकांना याचा बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर काही राशींच्या लोकांनी या काळात सांभाळून राहण्याची गरज आहे. मीन राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींचं नशीब बदलू शकतं हे जाणून घेऊयात.
द्रिक पंचांगानुसार, शनी 29 मार्च 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत 3 जून 2027 पर्यंत असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनी या राशीच्या नवव्या आणि दहाव्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फारच लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनी या राशीच्या सप्तम आणि अष्टम चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांची आधीपासून सुरु असलेली साडेसाती संपेल.या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. तुमच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते. तसेच, जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
या राशीच्या दुसऱ्या चरणाचा स्वामी असून तो तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच, लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही छोट्या-मोठ्या यात्रेला देखील जाऊ शकता. तुमची धार्मिक कार्यात आवड वाढेल. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासात चांगलं यश मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: