एक्स्प्लोर

Horoscope Today 08 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 08 November 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 08 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत दिली असेल तर आज तुम्हाला एक मोठी आणि चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त पगार मिळेल. या नवीन नोकरीच्या ऑफरमुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, तुमचा व्यवसाय खूप समाधानकारक नफ्यात असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, परंतु तुमचे खर्चही तितकेच वाढतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. त्यांच्याशी चांगलं वागून तुम्ही काम वेळेवर पूर्ण करू शकाल, तुमचे सहकारीही तुम्हाला चांगली साथ देतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात कुठेतरी बाहेर प्रवास करू शकता, जिथे तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकेल. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. आज आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या.

मिथुन (Gemini Today Horoscope)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस खूप व्यस्त असेल. आज कामाचा ताण खूप जास्त असेल, त्यामुळे तुमचा दिवस तणावात जाईल आणि संध्याकाळी तुम्हाला थकवाही जाणवू शकतो. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा बिझनेस चांगली प्रगती करेल, फक्त तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. तुमचं सध्या कुठेतरी लफडं सुरू असेल तर तुमचं लव्ह लाईफ चांगलं राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या लव्ह लाईफबद्दल सांगण्याची हिंमत करू शकता. आज तुमचे तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी मतभेद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा.

कर्क (Cancer Today Horoscope) 

आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप काम करावं लागेल. काम करताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, तुमच्या सहकाऱ्यांवर जास्त रागावू नका. अन्यथा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. आज व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि तुमच्या मालाची विक्री कमी झाल्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्यांशी किंवा नातेवाईकांशी भांडणं टाळा, अन्यथा तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात. तुमच्या मित्रांसोबत फिरण्यात जास्त वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा तुमचे करिअर घडवण्यावर लक्ष द्या. तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. 

सिंह (Leo Today Horoscope) 

आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाद आज टाळावे, अन्यथा तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागतील, त्यामुळे थोडं सावध राहा आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

कन्या (Virgo Today Horoscope) 

आजचा दिवस चढ-उताराचा असेल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचा बॉस तुमची तुमच्या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बदली करेल, परंतु तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पगार मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.  व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही थोडा त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे विचारपूर्वक गुंतवावे किंवा एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने गुंतवावे. तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. आज गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या नवीन ऑफिसमध्ये नुकतेच रुजू झाले असाल तर  तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. जे तुम्हाला तुमच्या भविष्यातही उपयोगी पडेल. ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योग्य नफा मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल. कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर ते सोडून देण्याचा प्रयत्न करा, अन्यथा, त्यामुळे तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता आणि तुम्हाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)   

दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर  तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पद्धतशीरपणे काम केले तर चांगले होईल. व्यावसायिकांनी त्यांच्या मत्सरी लोकांपासून सावध राहावे, ते  तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तरुणांनी कुठेतरी रागावणे टाळावे, जास्त राग आल्यास शांत राहावे, तसेच जोडीदारावर विनाकारण रागावणे टाळावे. सर्दी, खोकला, ताप असे जे काही आजार तुमच्या आरोग्याला त्रास देत होते, उद्या तुम्हाला आराम मिळू शकतो.  

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

तुमचे बोलणे केवळ टीम लीडरलाच कठोर वाटू शकत नाही तर इतर सहकाऱ्यांनाही दुखवू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. छोट्या व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागू शकतो. परंतु काळजी करू नका, हळूहळू सर्व परिस्थिती सुधारू शकतs. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सामंजस्याने काम करा, छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण्याऐवजी एकमेकांना साथ द्या. महिलांनी खासकरून त्यांच्या केसांची काळजी घ्यावी. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मात्र, आज दिवसभरात तुमचा खूप खर्च होईल. दिवाळीचा सण असल्या कारणाने घरी पाहुण्यांची ये-जा सुरु असेल. तसेच, नवीन काम सुरु करण्यासाठी तुम्हाला काही काळ जाऊ द्यावा लागेल. कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. तसेच, कुटुंबियांबरोबर लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेला भेट द्याल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल. तसेच, जर तुम्ही नवीन घर, वाहन, प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्याचबरोबर तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. मात्र, तुमच्यासमोर अनेक आव्हानंदेखील असतील. त्याचा तुम्हाला सामना करता यायला हवा. तसेच, तुमच्या आरोग्याबाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवता येईल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
Embed widget