Shani Gochar 2024 : शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा
Shani Gochar 2024 : पंचांगानुसार, कर्मफळदाता शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे शक्तिशाली असा 'शश राजयोग' निर्माण झाला आहे.
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) हा कर्मफळदाता आणि न्यायदेवता आहे. तो प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देणारा आहे. तसेच, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला (Lord Shani) तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शनीच्या वक्री चालीचा परिणाम हा प्रत्येक राशीनुसार (Zodiac Signs) अडीच वर्षांचा असतो.
पंचांगानुसार, कर्मफळदाता शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे शक्तिशाली असा 'शश राजयोग' निर्माण झाला आहे. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र, तीन राशींसाठी शश राजयोगाचा परिणाम फार अशुभ असणार आहे. त्यामुळे अशा कोणत्या तीन राशी आहेत ज्यांची यंदाची दिवाळी संकटांची असेल ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या शश योगाचा अशुभ परिणाम वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात तुमची व्यवसायात वाढ होण्याऐवजी तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक संकटांचा सामना करावा लागेल. त्याचबरोबर या काळात तुमचा मूडही चांगला नसेल. त्यामुळे तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तो या काळात करु नका. अन्यथा तुम्हाला त्यात यश येणार नाही. कर्जाच्या वाढत्या दबावामुळे काही राशींचे लोक या काळात प्रचंड तणावात असतील.
तूळ रास (Libra Horoscope)
कर्मफळदाता शनीच्या शश राजयोगाचा अशुभ परिणाम तूळ राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. जुन्या कर्जाच्या ओझ्यामुळे या राशीचे लोक प्रचंड दबावात आणि तणावात असतील. तुम्हाला अनेक संकटांचा सामनाही करावा लागेल. तसेच, या काळात तुमच्या कुटुंबातील वातावरणातही सुख-शांती नसेल. याचा नकारात्मक परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर दिसून येईल.
मीन रास (Pisces Horoscope)
यंदाचा दिवाळीचा सण मीन राशीच्या लोकांसाठी काहीसा चांगला नसणार आहे. शनीच्या शश योगामुळे नोकरदार वर्गातील लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच,तुमच्या उत्पन्नात वाढ न झाल्यामुळे तुम्ही प्रचंड तणावात असाल. जे लोक या काळात नवीन व्यवसाय सुरु करु इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ चांगला नाहीये. भविष्यात तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :