Shani Gochar 2024 : साडेसाती आणि ढैय्याचा असणार भयंकर प्रभाव; 'या' 5 राशींचा सर्वात वाईट काळ लवकरच होणार सुरु
Shani Gochar 2024 : 2025 मध्ये संक्रमण करुन शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 5 राशींचा वाईट काळ लवकरच सुरु होणार आहे.
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे , कर्मफळदाता शनी (Shani Dev) अडीच वर्षांनी राशी परिवर्तन करतात. 2025 मध्ये संक्रमण करुन शनी (Lord Shani) मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 5 राशींचा (Zodiac Signs) वाईट काळ लवकरच सुरु होणार आहे.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनी 9 ग्रहांमध्ये सर्वात हळुवार गतीने चालणारा शनी जेव्हा राशी परिवर्तन करतात त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. सध्या शनी आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे तर मार्च 2025 मध्ये शनी संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे ते 2027 पर्यंत याच राशीत स्थित असणार आहे.
मीन राशीत संक्रमण करताच 3 राशींच्या लोकांवर साडेसाती आणि 2 राशींवर ढैय्या सुरु होणार आहे. यामुळे 2025 मध्ये मेष, कुंभ आणि मीन राशीत शनीची साडेसाती असणार आहे. तर, सिंह आणि धनु राशीवर शनीची ढैय्या असणार आहे. या राशींच्या लोकांना शनी भयंकर त्रास देणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
शनीने मीन राशीत संक्रमण करताच मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होणार आहे. मेष राशीवर साडेसातीची ही पहिली पायरी असणार आहे. शनी या लोकांना पदोपदी संकटांचा सामना करायला लावणार आहे. यांच्या उत्पन्नात देखील घट होईल. तसेच, तुम्हाला कर्ज देखील फेडावं लागणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीची मूळ रास कुंभ आहे. सध्या कुंभ राशीत शनीच्या साडेसातीची शेवटची पायरी सुरु आहे. या काळात तुमच्यात मतभेद निर्माण होतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकतं. तसेच, आरोग्याच्या अनेक तक्रारी तुम्हाला जाणवतील. यासाठी वेळीच डॉक्टराचा संपर्क साधा आणि ट्रिटमेंटला सुरुवात करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांमध्ये पुढच्या वर्षीपासून शनीच्या साडेसातीची दुसरी पायरी सुरु होणार आहे. साडेसातीची दुसरी पायरी ही सर्वात कठीण असणार आहे. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला आजाराचा देखील सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार कठीण असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :