एक्स्प्लोर

Horoscope Today 26 October 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 26 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मात्र, आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. तसेच, तुमचं नुकसानही होऊ शकतं. तसेच, जर कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्वरित तुमच्या बॉसची माफी मागा. शनिवारचा वार असल्या कारणाने तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आजच्या दिवसांत एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, बहीण-भावाबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ दिसून येईल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आजच्या दिवसात तुम्ही आध्यात्माशी संबंधित काही कार्य करु शकता. तसेच, तुम्ही पार्टनरशिपमध्ये नवीन कार्याची सुरुवात करु शकता. आज तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन तुम्ही तुमचं ध्येय गाठा. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन पद मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्यावर कामाचा भार सोपावला जाऊ शकतो, तुम्ही ते काम पूर्ण झोकून देऊन करू शकता.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आधीच्या चुकांबद्दल थोडं सावध राहून विचार करा, त्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची चूक करू नका. तुमचं एखादं मोठं काम आज चुकू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता, त्यांना भेटून तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही तुमची पार्टी खूप एन्जॉय कराल.

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध घ्या.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस लाभाचा असेल, तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांनी सरकारी नियमांचं उल्लंघन करू नये, कारण यावेळी तुम्ही काही चूक केली तर तुमच्यावर सरकारी कारवाई होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळेल. तुम्ही ते काम वेळेत पूर्ण कराल.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. सकस आहार घेतला पाहिजे. एखादी आरोग्यविषयक समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणारे आज कामाचा योग्य प्लॅन बनवतील आणि त्यानुसार काम करतील, तर तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. तर तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी हुशार लोकांचं ऐकलं पाहिजे आणि ते काय म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याकडे खूप लक्ष द्यावं लागेल.

तूळ (Libra Today Horoscope) 

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आज कामावर सर्वांचं सहकार्य लाभेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्ग आज नवीन काहीतरी करुन दाखवेल, ज्यामुळे येत्या काळात चांगला नफा होईल. परीक्षेसाठी चांगली तयारी करा, चांगले गुण मिळतील. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, अंगदुखी, पाठदुखीचा भीषण त्रास तुम्हाला जाणवेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांना आज कामाचा भार जास्त जाणवेल, बाकीच्यांना दिवस सुखाचा असेल, कार्यालयीन वातावरण चांगलं राहील. व्यावसायिकांच्या उत्पादनात वाढ होईल, आज तुम्हाला चांगला नफा मिळेल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस कामाचा असेल. घरी तुम्हाला आई-वडिलांना मदत करावी लागेल. आरोग्य चांगलं राहील, आज जास्त काळजी करण्याची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरदार लोकांना आज अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. सहकारी आणि वरिष्ठांशी सावधगिरीने बोला, वाद होऊ शकतात. व्यावसायिकांनी आज थोडं जपून राहावं, एखादा ग्राहक तुमचा वेळ वाया घालवू शकतो. तुम्ही आज मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता, दिवाळी शॉपिंग करू शकता. आज तुम्ही तब्येतीची थोडी काळजी घ्या. अंगदुखीचा त्रास जाणवू शकतो, जास्त वेळ एकाच जागी बसू नका.

मकर (Capricorn Today Horoscope)

आज कामात थोडा चंचलपणा दाखवा, ऑफिसला पोहोचायला उशीर करू नका. आज व्यवसायात तुम्हाला थोडं धीराने घ्यावं लागेल, एखादा ग्राहक फसवणूक करू शकतो.  आज कोणतंही काम नीट जबाबदारीने पार पाडा, एखादी गल्लत होऊ शकते. आज तुमचं आरोग्य ठणठणीत असेल. कसलीच काळजी करण्याची गरज नाही.

कुंभ (Aquarius Today Horoscope)              

आजचा दिवस भाग्याचा आहे. आज तुम्हाला नोकरीत बोनसची किंवा पगारवाढीची शुभवार्ता मिळू शकते. व्यावसायिकांना आज नवीन प्रोजेक्ट मिळतील. आजचा दिवस नफ्याचा असेल, नवीन ग्राहक जोडले जातील. विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा, चांगला अभ्यास केला तरच प्रगती होईल. आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. कुठलाच त्रास तुम्हाला जाणवणार नाही. 

मीन (Pisces Today Horoscope)

आज कामावर डोकेदुखी वाढू शकते, एखादा शत्रू तुमच्याविरोधात षडयंत्र रचू शकतो, जपून राहा. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर, नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याची रिस्क घेऊ नका, सध्या आहे तशीच गाडी चालू द्या. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे एकाग्रतेने अभ्यास करावा, तरच परीक्षेत चांगले गुण मिळतील. आज तुम्हाला थोडा मानसिक त्रास जाणवेल. जास्त विचार करू नका. योगा, व्यायाम करुन दिवस घालवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची थेट चाल; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  5 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Group NCP 2nd List : जयंत पाटलांनी जाहीर केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 26 oct 2024Samadhan Sarvankar : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? समाधान सरवणकर म्हणतात, दबाव येतोय..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
Satara : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड उत्तर, कोरेगाव अन् फलटणचा उमेदवार जाहीर, माण, सातारा अन् वाईचा सस्पेन्स कायम, पाटणचा तिढा कसा सुटणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड उत्तर, कोरेगाव, फलटणचे उमेदवार जाहीर, माण, वाई अन् साताऱ्याचा सस्पेन्स कायम 
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
Sharad Pawar NCP Candidate 2nd List 2024: खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
Kolhapur District Assembly Constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
Embed widget