Shani Dev : शनीची लवकरच वक्री चाल! 'या' 3 राशींना मिळतील मोठ्या संधी, प्रत्येक कामात मिळणार यश
Shani Dev : सध्या शनी आपली मूळ रास कुंभ राशीत आहे. या राशीत शनी 2025 पर्यंत असणार आहे.
Shani Dev : कर्मफळदाता आणि न्यायाची देवता असणारा शनी (Shani Dev) एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. शनीला (Lord Shani) एका राशीतून पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी आपली मूळ रास कुंभ राशीत आहे. या राशीत शनी 2025 पर्यंत असणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी याच राशीत मार्च 2025 पर्यंत असणार आहे. तसेच, 30 जून रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. तर, या अवस्थेत तो 15 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. शनीच्या वक्री अवस्थेमुळे काही राशीच्या लोकांवर याचा परिणाम होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीत सध्या शनी आठव्या चरणात आहे. या राशीच्या सातव्या आणि आठव्या चरणाचा स्वामी शनी आहे. त्यामुळे शनीच्या वक्री चालीचा या राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होणार आहे. कर्क राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभाची संधी मिळेल. तसेच, तुमच्या धन-धान्य, संपत्तीत वाढ होईल. कुटुंबीयांबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. नोकरीच्या बाबतीत बोलाये झाल्यास अनेक संधी तुमच्या हातून सुटतील. पण तुम्हाला चांगली नोकरी मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या दरम्यान पूर्ण होतील. तसेच, तुमची आर्थिक स्थितीदेखील मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबीयाबरोबर तुमचा वेळ अगदी चांगला जाईल. तुमच्या नोकरीत प्रमोशनसह पगारवाढीचेही चांगले संकेत आहेत. एकूणच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या दुसऱ्या चरणक शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल चांगली ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना चांगली नोकरी मिलेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: