(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : आता सोडा सर्व चिंता; शनीचं नक्षत्र परिवर्तन पालटणार 5 राशींचं नशीब, होणार धनवर्षाव
Shani Dev : शनीच्या चालीचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होतो. शनीच्या अशुभ प्रभावाने ज्याप्रकारे व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो, त्याप्रमाणे शनीच्या शुभ परिणामांनी आयुष्य आनंदी होतं.
Shani Nakshatra Parivartan : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीने (Shani Dev) 18 ऑगस्टला पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनीने (Lord Shani) नक्षत्र परिवर्तन करताच काही राशीच्या लोकांना शुभ, तर काही राशीच्या लोकांना अशुभ परिणाम मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला विशेष स्थान देण्यात आलं आहे. शनीला पापी ग्रह देखील म्हटलं जातं. शनीच्या अशुभ प्रभावाची भीती प्रत्येकाला वाटते. शनीचं नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशीसाठी भाग्याचं ठरेल? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीचं नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं,यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. संपत्तीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकतं.
धनु रास (Sagittarius)
शनिने नक्षत्र बदलणं हे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. यात परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तसेच या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल. या काळात लोक तुमच्या बोलण्यावर प्रभावित होऊ शकतात. तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले फायदे होतील. उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना या दिशेने यश मिळू शकतं.
कुंभ रास (Aquarius)
शनि परिवर्तन तुमच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतं. शनिदेवाने तुमच्या राशीत शश राजयोगही निर्माण केला आहे, त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच यावेळी तुम्ही लोकप्रिय व्हाल. तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना या काळात काही महत्त्वाचं यश मिळू शकतं. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी होईल. तसेच, अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Rahu 2024 : राहू 'या' राशींवर पडणार भारी; येता काळ संघर्षाचा, वर्षभर अडचणी संपता संपणार नाही