Shani Dev : 15 नोव्हेंबरला शनी होणार मार्गी; 'या' 4 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरु, शनीची सदैव राहील कृपा
Shani Dev : 15 नोव्हेंबरला शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. तब्बल 139 दिवसांच्या कालावधीनंतर शनी मार्गी होणार आहेत. यामुळे काही राशींचा गोल्डन टाईम सुरु होणार आहे.
Shani Dev : न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनी (Shani Dev) लवकरच कुंभ राशीत परिवर्तन करणार आहे. शनीच्या (Lord Shani) राशी परिवर्तनामुळे 4 राशींसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. या राशींच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे. जवळपास एक महिन्यांनी कर्मफळदाता शनी वक्रीपासून मार्गी होणार आहे. 15 नोव्हेंबरला शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. तब्बल 139 दिवसांच्या कालावधीनंतर शनी मार्गी होणार आहेत. यामुळे काही राशींचा (Zodiac Signs) गोल्डन टाईम सुरु होणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी 15 नोव्हेंबरचा काळ फार शुभ असणार आहे. या दरम्यान बिझनेस करणाऱ्या लोकांना चांगलं यश मिळेल. तसेच, अनेक नवीन कल्पना तुम्हाला सुचतील. शनीच्या मार्गी असल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल दिसून येतील. तुमच्या हातात मोठी डील मिळू शकते. या काळात तुम्ही तुमच्या कार्याशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
कर्क रास (Cancer Horoscope)
15 नोव्हेंबरला शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशी परिवर्तनाचा कर्क राशीवर चांगला परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगला बदलाव पाहायला मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी 15 नोव्हेंबर नंतरचा काळ फार चांगला असणार आहे. या काळात शनीदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं समाधान मिळेल. तसेच, नशीबाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले असतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी 15 नोव्हेंबर नंतरचा काळ फार शुभ असणार आहे. या काळात जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे लवकरच तुमचे दिवस पालटतील. तुमच्या आयुष्यात आनंद असेल. या काळात तुम्ही समाजसेवेला जास्त प्राधान्य द्याल. तसेच, सकारात्मक राहाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :