Shani Asta 2025 : अवघ्या काही दिवसांतच शनी होणार अस्त; 'या' 3 राशींचे भाग्य उजळणार, विविध स्त्रोतांमधून पैसा येणार
Shani Asta 2025 : वैदिक पंचांगानुसार, शनी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07.01 वाजता अस्त होणार आहे. तर, 6 एप्रिल पर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे.
Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) सर्वात महत्त्वाचा ग्रह मानण्यात आलं आहे. शनीला (Lord Shani) न्यायदेवता म्हणतात. त्यामुळे शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत स्थित राहतात. त्यामुळेच त्याचा प्रभाव सर्व राशींवर होतो.
शनी लवकरच कुंभ राशीत अस्त होणार आहे. वैदिक पंचांगानुसार, शनी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07.01 वाजता अस्त होणार आहे. तर, 6 एप्रिल पर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. याच काळात शनीचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. या काळात कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीची साडेसाती वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकते. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या वेतनात देखील चांगली वाढ होईल. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
या राशीच्या आठव्या आणि सातव्या चरणात शनी अस्त होणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांची देखील तुम्हाला चांगली साथ मिळेल. त्यांच्या साथीने तुम्ही अनेक कामे पूर्ण करु शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती लाभदायक ठरेल. या राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, मानसिक तणावापासून तुमची मुक्ती होईल. तुमच्या व्यवसायाचा अधिक मोठा विस्तार होईल. त्यामुळे पैशांशी संबंधित तुमच्या सर्व समस्या दूर होतील. या काळात धनलाभाचे देखील चांगले योग आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: